परंडा(प्रतिनिधी) श्रम संस्कार शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये परिवर्तन होते. राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये अनेक विद्यार्थी आपले जीवन उज्वल करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एकात्मतेची भावना मनात ठेवून आपल्या समाजामध्ये अमुलाग्र बदल घडवावेत असे प्रतिपादन झाडबके महाविद्यालय बार्शी येथील प्राचार्य डॉ मनोज गादेकर यांनी शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजने विभागाचे शिबिर मौजे बोडका तालुका परांडा येथे आयोजित करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटक म्हणून प्राचार्य डॉक्टर मनोज गाडेकर हे उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर दिनांक 16 जानेवारी 26 ते 22 जानेवारी 2026 दरम्यान बोडखा या गावी आयोजित करण्यात आले आहे. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मराठी विभाग प्रमुख डॉ. गजेंद्र रंदील, कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्रीमान झाडबुके महाविद्यालय बार्शी या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मनोज गादेकर, सुलाखे महाविद्यालय बार्शी येथील प्रा डॉ बाळासाहेब लांडे उपस्थितीत होते. प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने, बोडखा या गावचे सर सरपंच विठ्ठल करडे, माजी उपसरपंच शंकर आबा पाटील, एडवोकेट आकाश खवले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुरेश चांदणे, शाळेतील सहशिक्षक नागनाथ उकिरडे व गावचा पैलवान उमेश सुकळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना हे विशेष श्रमसंस्कार शिबिर पाणलोट व्यवस्थापन आणि पडीक जमीन विकास यावर शाश्वत युवा विशेष भर या थीमवर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये ग्रामस्वच्छता, व्यक्तिमत्व विकास, जलसंवर्धन, रक्तदान शिबिर, कृषी विकास, व्यसनमुक्ती, वृक्षारोपण व संवर्धन, आरोग्य तपासणी शिबिर इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या शिबिरासाठी कार्यक्रमाधिकारी म्हणून प्रा डॉ दीपक तोडकरी, प्रा जगन्नाथ माळी तसेच सह कार्यक्रमाधिकारी म्हणून डॉ अरुण खर्डे, डॉ सचिन चव्हाण, डॉ अमर गोरेपाटील, डॉ संभाजी गाते डॉ विशाल जाधव, डॉ शहाजी चंदनशिवे हे काम पहात आहेत. या उद्घाटन प्रसंगी डॉ अतुल हुंबे, डॉ संतोष काळे, डॉ अक्षय घुमरे, प्राध्यापिका सुरेखा सातव, प्राध्यापिका नलवडे प्राध्यापिका शेख प्रा रामेश्वर गायकवाड, डॉ प्रशांत गायकवाड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डीजे पवार यांनी केले. प्रास्ताविक प्रा डॉक्टर दीपक तोडकरी यांनी केले. याप्रसंगी प्रा बाळासाहेब लांडे बार्शी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप प्रा डॉ रंदील गजेंद्र यांनी केला तर डॉ सचिन चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील स्वयंसेवक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी बोडखा गावातील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.