शिवसेना(शिंदे गट) जि.प./ प.स.प्रचाराचा नारळ ; आ.तानाजीराव सावंत यांच्या हस्ते सोनारी येथे फोडणार-जाकीर सौदागर

परंडा (प्रतिनिधी):धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, धाराशिव जिल्ह्याचे मा.पालकमंत्री  तथा मा. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजीराव सावंत हे  भूम-परंडा-वाशी चे आमदार जिल्हा परिषद पंचायत समिती, प्रचाराचा अधिकृत शुभारंभ करणार आहेत. त्यानिमित्ताने शनिवार दि.३१ जानेवारी२०२६ रोजी तालुक्यातील प्रसिद्ध असे  सोनारी येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात दर्शनासाठी जाऊन आणि नारळ फोडून ते आपल्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात करणार आहेत.


आमदार तानाजीराव सावंत यांनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात मतदारसंघात राबवलेली विकासकामे आणि आरोग्य क्षेत्रातील ‘आरोग्य वारी आपल्या दारी’ सारख्या लोकोपयोगी योजनांच्या बळावर ते जिल्हा परिषद पंचायत समिती च्या मतदानासाठी,  व एकनाथ भाऊंचे हात बळकट करण्यासाठी , शिवसेनेचे सर्व उमेदवार निवडून पक्षाची ताकत वाढवण्यासाठी प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत.
यावेळी मतदारसंघातील सर्व शिवसेना, मित्रपक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते ,समर्थकांची उपस्थित राहावे असे आव्हाहन नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी केले आहे

दरम्यान कंडारी येथील दर्शनानंतर मा .मंत्री सावंत हे मतदारसंघातील विविध गावांमध्ये संवाद दौरा करणार असून, जनतेसोबत संवाद साधणार यामुळे प्रचाराचा जोर अधिक वाढणार असल्याचे  चित्र दिसून येत आहे.

error: Content is protected !!