परंडा |माझं गांव माझं शहर
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, परंडा तालुक्यातील जानेवारी ते डिसेंबर २०२६ दरम्यान मुदत संपणाऱ्या ७० ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. या प्रक्रियेसाठी १०, ११ आणि १२ जून रोजी संबंधित ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या आहेत.
ही प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी नियुक्त अधिकारी व सहाय्यकांची आढावा बैठक ९ जून रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय, परंडा येथे होणार आहे. तरी तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी संबंधित ग्रामसभेला उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
परंड्यात ७० ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर
