परंडा(माझं गांव माझं शहर ) परंडा तालुक्यातील अनेक ग्रामपचांयतीमध्ये सरपंच ग्रामसेवक यांचेकडील वसुली नोटीसा दिलेल्या आहेत त्यानुसार कार्यकत्यांनी गटविकास अधिकारी परंडा पंचायत समिति परंडा दिले निवेदन या निवेदनात असे म्हटले आहे की भ्रष्टाचार सिद्ध झालेल्या माजी सरपंचांना प्रशासक पदापासून दूर ठेवा; माहिती आधिकार कार्यकर्ते महासंग आक्रमक यांची मागणी .
गावाच्या विकासकामांत भ्रष्टाचार केल्याचा ठपका ज्यांच्यावर ठेवण्यात आला आहे आणि ज्यांच्याकडून अपहाराची रक्कम वसूल करण्याचे आदेश गटविकास अधिकारी प्रशासनाने दिले आहेत, अशा वादग्रस्त माजी सरपंचांची 'प्रशासक' म्हणून नियुक्ती करू नये, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे. भ्रष्टाचार सिद्ध झालेल्या व्यक्तीच्या हाती पुन्हा गावाची सूत्रे दिल्यास पारदर्शक कारभाराचा बोजवारा उडेल, अशी भीती माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी व्यक्त केली आहे.
नेमके प्रकरण काय?
संबंधित माजी सरपंचांच्या कार्यकाळात विविध योजनांमध्ये आर्थिक अनियमितता झाल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या होत्या. या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडून भ्रष्टाचार सिद्ध झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे . इतकेच नव्हे तर, सरकारी निधीचा दुरुपयोग केल्याप्रकरणी त्यांच्याकडून ठराविक रक्कम वसूल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
ग्रामस्थांचा विरोध का?
ग्रामपंचायतीची मुदत संपल्यानंतर लोकशाही मार्गाने नवीन प्रशासकाची नियुक्ती करताना स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीला प्राधान्य मिळणे अपेक्षित असते. मात्र, ज्यांनी यापूर्वीच पदाचा गैरवापर करून गावाचे नुकसान केले आहे, त्यांनाच पुन्हा प्रशासक म्हणून नेमण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा जिल्हात आहे.
“ज्यांच्यावर वसुलीची टांगती तलवार आहे, ते गावाचा विकास काय करणार?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.प्रशासनाला इशारा:या संदर्भात माहिति अधिकार कार्यकर्ते महासंग याणी मेल द्वारे . निवेदन देण्यात आले आहे. जर भ्रष्टाचार सिद्ध झालेल्या व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्ती केली, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
या निवेदनावर महिति अधिकार कार्यकर्ता माहासंग धाराशिव जिल्हा . यांच्या सहया आहेत, शेख फारूक , कानिफनाथ सरपने , विजय मेहेर , जमिर शिकलकर , धनंजय गोफने , फारूक मूलानि , किशोर येवारे, अमित आगरकर , आसलम पला , आलिम शिकलकर, भाऊ करने, गोळे टेलर इत्यादी उपस्तीत होते .