रविराज साबळे-पाटील प्रकरणी धाराशिव मध्ये दिव्यांग बांधवांचा संताप; जिल्हाधिकारी दरबारी तीव्र निषेध

धाराशिव(प्रतिनिधी) रीलस्टार रविराज साबळे-पाटील यांच्या सोशल मीडियावरून सुरू असलेल्या भ्रामक, दिशाभूल करणाऱ्या आणि समाजात फूट पाडणाऱ्या प्रचाराविरोधात प्रहार अपंग क्रांती आंदोलन (महाराष्ट्र राज्य) तर्फे दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निषेध नोंदविण्यात आला.

जिल्हाध्यक्ष मयूर काकडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो दिव्यांग पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रशासनास अवगत करण्यासाठी प्रखर घोषणाबाजी केली. “प्रशासन जागं हो! दोषींवर कारवाई करा!” अशा घोषणा देण्यात आल्या.

याप्रसंगी बाळासाहेब कसबे, महेश माळी, दिनेश पोतदार, इसाक शेख, शब्दार्थ सय्यद, इलाही शेख, सिद्राम पवार, नागराज मसरे, पैगंबर मुलानी, धनंजय खांडेकर, विकास शिरसागर, गौतम दुधे, बाबासाहेब भोईटे, दत्ता पवार, विठ्ठल चव्हाण, नाना इंगळे आदींसह प्रहारचे शेकडो कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या लेखी निवेदनात नमूद करण्यात आले की, काही व्यक्ती सोशल मीडियाद्वारे शेतकरी समाजात तणाव निर्माण करण्यासाठी खोटे आरोप व भडकावू संदेश पसरवत आहेत. या समाजविघातक कृतींवर तात्काळ कारवाई करून संबंधितांवर IT Act आणि BNS कलम 197(1)(D) नुसार गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी हॉलमध्ये येऊन स्वतः निवेदन स्वीकारून आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
जर शासनाने तत्काळ कारवाई केली नाही, तर भविष्यात संघटनेतर्फे राज्यभर अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असेल असा इशारा सदर निवेदनात देण्यात आला आहे.

याप्रसंगी निवेदन स्वीकारताना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार साहेब यांच्यासोबत निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव मॅडम व अन्य कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!