परंडा :(माझं गांव माझं शहर) परंडा तालुक्यातील कुभेफळ येथील ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच व ग्रामस्थांच्या वतीने ‘स्वराज्य जननी’ राजमाता जिजाऊ यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. १२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी गावातील ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी गावातील मान्यवर, तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उपस्थित वक्त्यांनी राजमाता जिजाऊंच्या जीवनावर प्रकाश टाकत, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेले संस्कार आणि स्वराज्याच्या स्थापनेतील त्यांच्या योगदानाबद्दल माहिती दिली. यानिमित्ताने गावातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी जिजाऊंच्या जीवनावर आधारित पोवाडे आणि भाषणे सादर केली. “जिजाऊंचे विचार आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असून, महिला सक्षमीकरणासाठी त्यांचे आदर्श समोर ठेवणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन यावेळी प्रमुख पाहुण्यांनी केले.
जयंतीनिमित्त कुभेफळ येथील ग्रामपंचायत उपसरपंच फारूक शेख . हेडमास्तर मुसळे सर . पाटील सर . विनोद नायकोडे . आकबर शेख . लहू बोराडे . विनोद कोरे . कादर बेग . दत्ता कोटोळे . तात्यासाहेब हजारे . मुकरम शेख . दस्तगीर शेख . गवश पठान गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .