धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंबांना पुणेकर युवकांचा मदतीचा हात.!

परंडा(तानाजी घोडके)महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील युवक जे सध्या पुणे येथे नोकरी आणि शिक्षण घेत आहेत अश्या काही युवकांनी आपल्या समाजाला काहीतरी देणं लागत या उदार हेतूने त्यांनी सुरू केलेल्या आपुलकी सोशल फाउंडेशन, पुणे या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आणि जीव फाउंडेशन पुणे व शिवसाम्राज्य प्रतिष्ठान पुणे यांच्या सहकार्याने परांडा तालुक्यातील आवारपिंपरी आणि शिराळा येथील पूरग्रस्त कुटुंबांना तसेच, सोनगिरी, खासगाव, रुई आणि कात्राबाद येथील विधवा, परीतक्ता , एकल आणि गोरगरीब महिलांना अन्नधान्य किट, कपडे किट, मेडिकल किट, ब्लँकेट, चटई, सॅनिटरी नॅपकिन व इतर जीवनावश्यक साहित्य वाटप केले. तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, बिस्किटे आणि इतर साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये १५० पेक्षा जास्त किट वाटप करण्यात आले आहेत.

त्यांच्या या सामाजिक कार्यात मदत वाटप करण्यात उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे तुकाराम ढोरे यांनी हातभार लावला असून, या संकटाच्या काळात बाधित कुटुंबांना उभारी व धीर दिला आहे.

error: Content is protected !!