अस्मानी संकटात शैक्षणिक संकुलाचे होत्याचे नव्हते झाले.

परंडा (माझं गांव माझं शहर) आभाळ फाटल्यागत कोसळणारा मुसळधार पाऊस, संकटात भर म्हणून निसर्गाच्या कोपामुळे कितेक वर्ष हजारो लोकांची , मुक्या जनावरांची व बळीराजाच्या मदतीला खंबीरपणे निसर्गाच्या सान्निध्यात तग धरून असणारा मोहरी तलावांने अक्षरशा लोटांगण घातलं.तलावतील पाणी व कोसळणा-या पाऊसाच्या पाण्यांनी जनू काही अस्मानी युती केली अणि खैरी,नळी नदीच्या काठावरील शेतकरी, शेतकऱ्यांचे पशुधन, शैक्षणिक संकुल…

अधिक बातमी वाचा...

“स्वस्थ नारी – सशक्त परिवार” अभियानाचा आ. समाधान अवताडे यांच्या हस्ते शुभारंभ !

📍 पंढरपूर(माझं गांव माझं शहर) पंढरपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” या अभियानाचा माझ्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. हा उपक्रम महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि संपूर्ण समाजात आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी संपूर्ण देशभरात राबविण्यात येत आहे. या शिबिरामुळे महिलांना आरोग्य सेवा सोप्या व सुलभ पद्धतीने मिळणार आहेत. आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी…

अधिक बातमी वाचा...

दिव्यांग सेस योजनांच्या अर्जासाठी मुदतवाढ- तानाजी घोडके(दिव्यांग अध्यक्ष)

धाराशिव,दि.२६ सप्टेंबर (माझं गांव माझं शहर) जिल्हा परिषद स्वसंपादीत उत्पन्नातील ५ टक्के दिव्यांग सेस अंतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता समाजकल्याण विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत.यामध्ये मतिमंद व्यक्तींना आर्थिक सहाय्य तसेच अतितीव्र दिव्यांगांच्या पालकांना सहाय्य या योजनांचा समावेश आहे. पूर्वी अर्ज स्वीकृतीसाठी २६ सप्टेंबर २०२५ पर्यंतची मुदत देण्यात आली होती.मात्र लाभार्थी व दिव्यांग संघटनांच्या…

अधिक बातमी वाचा...

आज दि.२७ रोजी सर्व शाळांना सुट्टी जाहीर -जिल्हाधिकारी

परंडा(प्रतिनिधी) हवामान विभागाकडून दिलेल्या ऑरेंज अलर्टनुसार शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबत. हवामान विभागाकडून दिनांक २७/०९ /२०२५ रोजी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, संभाव्य मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव यांच्या सूचनेनुसार दिनांक २७/०९/२०२५ रोजी जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या/सर्व माध्यमाच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात…

अधिक बातमी वाचा...

धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान; पंचनाम्यासाठी फोटोची सक्ती नाही – जिल्हाधिकारी

धाराशिव,दि. २५(माझं गांव माझं शहर) धाराशिव जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले असून, शेतकऱ्यांना पंचनाम्यासाठी फोटो देण्याची कोणतीही सक्ती नाही, असे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी आज स्पष्ट केले. जिल्ह्यात सलग झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पिकांचे…

अधिक बातमी वाचा...

सुयश विद्यालया विरुद्ध फिर्याद ; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन

बार्शी( प्रतिनिधी) : दि. 23 सप्टेंबर 2025 रोजी मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सोलापूर यांनी काढलेल्या आदेशान्वये अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व शाळांना सुट्टी घोषित करण्यात आली होती. मात्र या आदेशाचे उल्लंघन करत बार्शी येथील सुयश विद्यालय हे शाळा सुरु ठेवण्यात आल्याचे उघड झाले आहे. याबाबत प्रभारी गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती…

अधिक बातमी वाचा...

माणकेश्वर व देवगाव येथील पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची प्रवीण रणबागुल यांच्याकडून मदत

भुम / परंडा-दि,२५( प्रतिनिधी) शेतकऱ्यांच्या कुटुंबावर आभाळ फाटल त्यांच सगळच हिरांवल हा जलप्रलयाचा भूकंप आहे.शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूचा पुर आहे, पिकांच अतोनात नुकसान झाले असुन स्वप्नांचा चिखल हे वास्तव त्यांच्या जीवनात आहे.अतिवृष्टीमुळे हाजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे.शेतकरी शेतमजुरांच्या घरांमध्ये पाणी साचल्याने त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.जगावं की मरावं हे त्यांना कळायला मार्ग नाही सर्वच पिके…

अधिक बातमी वाचा...

महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पत्रकार बांधवांना दिलासा

मुंबई (प्रतिनिधी) पत्रकार कल्याण निधी वाढीसाठी व्हॉईस ऑफ मीडियाचा तीन वर्षांचा संघर्ष अखेर यशस्वी ठरला आहे. आज महाराष्ट्र शासनाने “शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी” अंतर्गत २० कोटी रुपयांच्या पुरवणी अनुदानास प्रशासकीय मान्यता दिली असून त्यामुळे या निधीची एकूण ठेव १०० कोटींवरून १२० कोटी रुपयांवर पोहोचली आहे . या निर्णयामुळे आकस्मिक मृत्यू, अपघात किंवा…

अधिक बातमी वाचा...

पंडित दिनदयाळ उपाध्याय जयंती निमित्त अभिवादन करताना-मा.आ. सुजितसिंह ठाकूर

परंडा :- एकात्म मानवतावादाचे आणि अंत्योदयाचे प्रणेते, भारतीय जनसंघाचे संस्थापक, कुशल संघटक आमचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्रोत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जयंती निमित्त भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी संपर्क कार्यालय परंडा येथे प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले..! पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय राजकारणातील एक प्रमुख प्रखर राष्ट्रवादी विचारवंत आणि समाजसुधारक होते, ज्यांनी “एकात्म मानवतावाद” या…

अधिक बातमी वाचा...

शेळगाव- माणिक बाबा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे विदारक मन हेलावून टाकनारं हे चित्र !

शेळगाव(प्रतिनिधी) अतिवृष्टीची वक्रदृष्टी हे विदारक मन हेलावून टाकनारं हे चित्र आहे परंडा तालुक्यातील सर्वाधिक पाण्याने वेढा दिलेले गाव म्हणजे शेळगाव याच गावातील माणिक बाबा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे या विद्या मंदिरात हजारो विद्यार्थ्यांनी ज्ञानाचे धडे गिरवून आपल्या यशस्वी जीवनाची वाटचाल केली. शाळेची आज दुरावस्था केली ती प्रचंड बरसलेल्या मेघराजाने नदीकाठावर असलेली माणिक बाबा माध्यमिक व…

अधिक बातमी वाचा...

तुळजापुरात शारदीय नवरात्रोत्सवाचा उत्साह; देवीच्या नित्योपचार पूजेला भाविकांची गर्दी

तुळजापूर, २५ (माझं गांव माझं शहर ) महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला तुळजापुरात मोठा उत्साह आणि भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे.नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेला, म्हणजेच आज गुरुवार, २५ सप्टेंबर रोजी, देवीची नित्योपचार पूजा मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने संपन्न झाली. या निमित्ताने सकाळपासूनच मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. पहाटे ६ ते सकाळी…

अधिक बातमी वाचा...

धाराशिव जिल्ह्यात “अजितदादा पवार” यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचा पाहणी दौरा.

भूम(तानाजी घोडके ) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी आज धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचा पाहणी दौरा केला. त्यांच्यासोबत विविध भागात जाऊन संवाद साधला. मा. अजितदादांनी आपल्या २४३ परांडा विधानसभा मतदारसंघातील भूम तालुक्यातील चिंचोली येथे पुरात मृत्युमुखी पडलेल्या कै. देवनाबाई वारे यांच्या कुटुंबाला सांत्वनपर भेट दिली. गोरमाळा येथे…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!