📍 पंढरपूर(माझं गांव माझं शहर) पंढरपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” या अभियानाचा माझ्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. हा उपक्रम महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि संपूर्ण समाजात आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी संपूर्ण देशभरात राबविण्यात येत आहे. या शिबिरामुळे महिलांना आरोग्य सेवा सोप्या व सुलभ पद्धतीने मिळणार आहेत.
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून महिलांचे आरोग्य सक्षम करणे आणि त्यातून परिवार व समाज सशक्त करणे या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या अभियानांतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत महिलांसाठी २० प्रकारच्या आरोग्यसेवा मोफत उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये कर्करोग, मधुमेह, हृदयरोग तपासणी, निदान-उपचार व संदर्भ सेवा तसेच शस्त्रक्रिया, आयुष्यमान भारत (आभा कार्ड) अंतर्गत पूर्णपणे लाभ मिळणार आहेत. तसेच, उपस्थित महिलांना व पुरुषांना आहार कोणता असावा व कोणता टाळावा याबाबत आहारविषयक सल्ला देखील देण्यात आला. तसेच, याचे प्रात्यक्षिक देखील करण्यात आले.
यावेळी डॉ. दीपक धोत्रे, श्री. सुभाष मस्के, श्री. प्रशांतभैया देशमुख, श्री. शंकर सुरवसे, श्री. निलेश अंबरे, श्री. विक्रम शिरसाट, श्री. लखन चौगुले, श्री. भैय्या कळसे, श्री. संतोष डोंगरे, श्री. मुन्ना भोसले, श्री. वैभव फसलकर, श्री. विवेक भिंगे, श्री. कृष्णा कवडे, पंढरपूर तालुका व परिसरातील महिला वर्ग आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
