अखंड हरीनाम सप्ताहानिमित्त पांढरेवाडी (पश्चिम) येथे भव्य रक्तदान शिबिर ; युवकांचा उत्स्फूर्त सहभाग!
परंडा, दि. २८ (प्रतिनिधी) – तालुक्यातील पांढरेवाडी (पश्चिम) येथे सुरू असलेल्या अखंड हरीनाम सप्ताहाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी आणि भक्तीचा संगम साधत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन गावचे प्रथम नागरिक शरद अभिमान भिल्लारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकार राहूल शिंदे, शिवाजी शिंदे, गणेश शिंदे,सुभाष भिल्लारे, शरद भिल्लारे आदी मान्यवर उपस्थित होते….