कळंब : रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त कळंब शहरांमध्ये अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न धाराशिव प्रेस क्लब शाखा कळंब यांच्या वतीने, अन्नदान, पाणी बॉटल,व रक्तदान शिबिर याचे आयोजन करण्यात आले होते.
५०० लोकांचे अन्नदान, १४०० पाणी बॉटल, व रक्तदान शिबिर राबवण्यात आले होते. त्यामध्ये १७ रक्तदात्याने रक्त दान करून कळंब शहरामध्ये आलेल्या शिवभक्ताने भरभरून प्रतिसाद दिला,
या कार्यक्रमाचे उद्घाटन गणेश शिंदे साहेब उपविभागीय अधिकारी कळंब यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून कळंबचे तहसीलदार हेमंत ढोकले साहेब, नायब तहसीलदार तापडिया साहेब, कळंब पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजित चिंतले साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक मगर साहेब, वारकरी संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ, धाराशिव प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष रहीम शेख, तालुका पत्रकार संघाचे विश्वस्त सतीश बप्पा टोणगे, माजी नगरसेवक प्रताप मोरे, ज्येष्ठ पत्रकार माधव सिंग राजपूत, रेणुका इन्स्टिट्यूट चे सर्वेसर्वा शरद जादवर, मंडल अधिकारी जगताप साहेब, न्यूज १८ चे जिल्हा प्रतिनिधी बालाजी निरफळ, पत्रकार, शितल कुमार धोंगडे प्राचार्य जगदीश गवळी, समाजसेविका ज्योतीताई सपाटे,समाजसेवक बौधराज( अण्णा )रणदिवे.
हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी पत्रकार, सुधाकर रणदिवे, पत्रकार, अमर चोंदे, पत्रकार, शिवप्रसाद बियाणी, पत्रकार, राहुल गाडे, पत्रकार, सतीश तवले, पत्रकार,अझहर पठाण, पत्रकार,राजेंद्र बारगुले, पवन बोबडे, व ज्याने बाल वयात मनापासुन शिवभक्तांची सेवा केली असे पत्रकार अमर चोंदे यांचे १३ वर्षाचे चिरंजीव शिवकुमार चोंदे या सर्वांचे सहकार्य लाभले.