भाजपा कार्यालयात पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार

परंडा(प्रतिनिधी) मराठी पत्रकार दिनानिमित्त परंडा तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचा भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी संपर्क कार्यालय, परंडा येथे सत्कार करुन ‘मराठी पत्रकार दिनाच्या’ शुभेच्छा दिल्या..
याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष श्री. अरविंदबप्पा रगडे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. श्री‌. संतोष सुर्यवंशी, माजी नगराध्यक्ष नगरसेवक श्री. रमेशसिंह परदेशी, अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. श्री. जहीर चौधरी, तालुका सरचिटणीस श्री. तानाजी पाटील, श्री. निशिकांत क्षिरसागर, युवा मोर्चा शहराध्यक्ष नगरसेवक श्री. अविनाश विधाते, युवा नेते नगरसेवक श्री. समरजीतसिंह ठाकूर, नगरसेवक श्री. अकिब पठाण,रामदास गुडे उपस्थित होते.

error: Content is protected !!