पुणे : महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा भूम–परांडा–वाशी मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे येथे त्यांचा नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर व त्यांच्या सहकाऱ्यांनी आमदार सावंत यांना पुष्पगुच्छ देऊन शाल घालून त्यांचा सन्मान केला. आमदार तानाजीराव सावंत यांनी राज्याच्या तसेच मतदारसंघाच्या विकासासाठी केलेल्या कामांची दखल घेत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमादरम्यान आमदार सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानत सर्वांच्या सहकार्यामुळेच समाजातील विविध विकासकामे शक्य होत असल्याचे सांगितले. तसेच सामाजिक ऐक्य आणि विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर यांचे चिरंजीव वसीम सौदागर, कैफ सौदागर, अबूतला सौदागर, मुसा कुरेशी, गौस शेख तसेच अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.