परंडा शहरातील प्रमुख रस्ते जलमय झाले आहेत.बावची व खासापुरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साचले आहे.

परंडा(तानाजी घोडके) शहरात पडलेल्या मोठ्या पावसाने हाहाकार उडाला आहे.ता.२१ रविवारी सायंकाळी सुरु झालेला मुसळधार पाऊस व सोमवारी राञभर धो धो मुसळधार पाऊस पडला.परंडा महसुल मंडळात ११४ मि.मीटर पावासाची यंदाच्या पावसाळ्यातील विक्रमी नोंद झाली.या पावसाने मंडई विभागातील रस्ते जलमय झाले होते.शहरातील सार्वजनिक गटारी मार्गावर मोठ्या प्रमाणात आतिक्रमण झाल्याने,गटारी तुंबल्याने जय भवानी चौकासह अनेकांच्या घरात दोन ते तीन फुटापर्यँत पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तुचे,संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले.

अनेकांच्या घराची मोठी पडझडही झाली. नगर पालिकाप्रशासनही हतबल झाले आहे. शहरात मागील पडलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा होत असतानाच सोमवारी राञभर जोरदार ,मुसळधार पाऊस कोसळला.या पडलेल्या पावसाने नागरीकांची झोपच उडाली. राञी २ वाजण्याच्या सुमारास जय भवानी चौक ,राजापुरा गल्ली,मोमीन गल्ली,खासापुरी रस्ता,बावचीकडे जाणारा रस्ता पुर्णपणे जलमय झाला होता.तीन ते वर्षानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली होती.या भागातील पालिका प्रशासनाने केलेल्या तीन ते चार भुट भुयारी गटारी अर्धवट झाल्याने आतील साचलेला गाळ सर्वञ पसरला आहे.पाण्याचा निचरा होण्यासाठी पुढील गटारीला मार्गचचे काम रखडलेल्याने सर्वञ पाणीच पाणी साचले होते.

शहरातील गाव तलाव ओअरफ्लो,होवुन बॅकवाटरने पाणी मुख्य लोकवस्तीत मोठ्या प्रमाणात शिरले.नृरसिंह नगर,राजापुरा गल्ली,भवानी शंकर मंदिर ,बावची रस्ता,जय भवानी चौक,मोमीन गल्ली,मंडई पेठ ,भिमनगर आदि भागात रस्त्यावर , परिसरात दोन ते तीन फुट पाणी साचले होते.पावसाचे पाणी वाहुन जाणाऱ्या नैसर्गिक मार्गावरच ,सार्वजनिक गटारीवर मागील कांही वर्षापासुन मोठ्याप्रमाणात अतिक्रमण झाल्याने पाणी नागरीवस्तीत शिरले आहे.बहुतांश तुंबलेल्या,अरुंद गटारीमुळे वाहुन जाणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यास विलंब लागत होता.

जय भवानी चौकात,तसेच शहरात कांही ठिकाणी घरांच्या भिंती ढासळुन मोठी पडझड झाली आहे.महसुल विभागाच्यावतीने पडझड घरांचे पाहणी व पंचनामे करण्याची मागणी होत आहे. शहरातील,भवानी शंकर मंदिरातील अंबाबाई मंदिरात सोमवार पासुन नवराञोत्सानिमित्त दैनंदिन कार्यक्रम सुरु होते.माञ,या मंदिरात चौहोबाजुने ,आतील भागातही सर्वञ पाणी असल्याने उत्सवावरच पाणी फेरले आहे.माजी आमदार सुजितसिंह ठाकुर यांच्या पुढाकाराने सकाळी ११ वाजता जेसीबीने चर खोदुन पाण्याचा निचरा करण्यात आला. बावची मार्गावर पाणी साठुन राहिल्याने रहदारीला,शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दुर्गंधीयुक्त,घाण पाण्यातुनच मोठी कसरत करीत वाट काढावी लागत आहे.

पालिका प्रशासनाने गटारीचा मार्ग खुला करुन पाण्याचा निचरा करुन घाण साठलेल्या पाण्याची विल्हेवाट लावावी अशी मागणी नागरीकातुन होत आहे.साठुन राहिलेल्या दुर्गंधीयुक्त घाण पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भिती निर्माण झाली असुन,पालीका प्रशासनाने औषध फवारणीसह विविध उपाययोजना करण्याची गरज आहे.

error: Content is protected !!