शेळगाव येथे महाराष्ट्र ग्रामीण बँक शेळगाव शाखेच्या वतीने २५ स्वयसहाय्यता गटांना ४८ लाखाचे बँक अर्थसहाय्य.

परंडा (प्रतिनिधी) उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंर्तगत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती परंडा व महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा शेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मा. गट विकास अधिकारी श्री.विनोद जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उमेद अंतर्गत स्थापन झालेल्या शेळगाव प्रभागातील ११व डोंजा प्रभागातील १४ महिला स्वयसहाय्यता समूहांना महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा शेळगाव यांच्या मार्फत २५ महिला स्वयंसहायता समूहांना ४८ लाख रुपये बँक कर्ज वाटप करण्यात आले .प्रथम बँक मेळाव्याचे उद्घाटन मा.श्री. सहाय्यक गट विकास अधिकारी श्री.रवींद्र जाधव साहेब, प्रशिक्षित सहाय्यक गट विकास अधिकारी मा.श्री काळे साहेब व महाराष्ट्र ग्रामीण बँक शेळगाव शाखाधिकारी मा.श्री.तुषार माने साहेब,तालुका अभियान व्यवस्थापक मा.श्री.ताटे सर, तालुका व्यवस्थापक आर्थिक समावेशन मा.श्री.खांडेकर, तालुका व्यवस्थापक – IBCB श्री तुकाराम ढोरे व प्रभाग समन्वयक लोणी समाधान माळी, यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
सदर कार्यक्रमामध्ये मा.श्री.रवींद्र जाधव साहेब,यानी महिलांना मार्गदर्शन करताना म्हणाले की उमेद अंतर्गत महिला स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून महिला ह्या स्वयंपूर्ण झाल्या आहेत व त्या आर्थिक सक्षम होणे आवश्यक आहे तसेच सदर कर्जाच्या माध्यमातून महिलांनी जास्तीत जास्त शाश्वत उपजीविकेचे साधने उभा करावीत व आपले आर्थिक उत्पन्नात वाढ करावी जेणे करून बँक कर्ज परतफेड करता येईल. तसेच मा.बँक शाखा व्यवस्थापक श्री तुषार माने यांनी महिलांना मार्गदर्शन करताना म्हणाले की उमेद महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून एक आर्थिक सबलता निर्माण केली आहे तसेच नियमितपणे घेतलेले कर्ज परतफेड करतात त्यामुळे आमच्या शाखे मार्फत जास्तीत जास्त गटांना बँक कर्ज देण्यात येणार आहे व शासनाच्या ज्या विविध विमा योजना आहेत त्या जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री खांडेकर यांनी आणि श्री.विलास ताटे यांनी आभार प्रदर्शन केले तर सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रभाग समन्वयक श्री.समाधान माळी , ग्राम सखी , कृती संगम सखी, प्रभाग संघ लिपिका ,यांचे यांनी मोलाचे सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.

error: Content is protected !!