अनाळा (माझं गांव माझं शहर) परंडा तालुक्यातील अनाळा येथील महाराष्ट्र ग्रामिण बँकेत कर्जदार खातेधारकांसाठी विशेष बँक अदालत आयोजीत करण्यात आली आहे . दि . १४ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० ते ४.३० या वेळेत बँक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे . या बँक अदालत मध्ये नवसंजीवनी योजना , उदयोजक दिलासा योजना , शेतकरी समाधान योजना , गटबंधन सहाय्यता योजना या विषयी कर्ज खातेदारकांना बँकेचे लातूर चे वरिष्ठ अधिकारी ए. बी. वावले मार्गदर्शन करणार आहेत . तरी योजनेचा लाभ थकित कर्जदारांनी लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र ग्रामिण बँकेचे शाखाधिकारी रवी चौधरी यांनी केले आहे .
प्रतिक्रिया – महाराष्ट्र ग्रामिण बँक अनाळा शाखेत गुरुवारी थकित कर्जदारांसाठी विशेष बँक अदालत आयोजित केली असून यामध्ये बँकेच्या विविध योजनेच्या माध्यमातून थकित कर्जदारांनी लाभ घ्यावा
– रवी चौधरी [शाखा व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामिण बँक , अनाळा ]