पत्रकार समाजाला दिशा दाखवणारा आरसा प्रा डॉ शाहाजी चंदनशिवे; परंडा व्हाईस ऑफ मीडियाकडून पत्रकार दिन उत्साहात

परंडा दि ७ ( प्रतिनिधी ) पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तो समाजाला दिशा दाखवणारा आरसा आहे . असे मत प्रा डॉ शहाजी चंदनशिवे यांनी व्यक्त केले . येथील शासकीय विश्रामगृहात ६ जानेवारी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने तालुकाध्यक्ष मुजीब काझी कार्याध्यक्ष प्रमोद वेदपाठक यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले .
याप्रसंगी प्रा डॉ चंदनशिवे बोलत होते आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी ज्या उद्देशाने पत्रकारिता सुरू केली त्याप्रमाणेच आजच्या पत्रकारांनी पत्रकारिता करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यावा. पत्रकार हा सर्वसामान्याचा दुवा आहे . ते विसरून चालणार नाही आज ग्रामीण भागात देखील सोशल मीडियाचे पत्रकार मोठ्या प्रमाणावर वाढल्याने ग्रामीण भागातील घडणाऱ्या घटनांच्या बातम्या लगेच समोर येत असल्याचे प्रा चंदनशिवे यांनी सांगितले .
ज्येष्ठ पत्रकार श्रीराम विद्वत मत व्यक्त करताना म्हणाले की आजची पत्रकारिता पूर्वीसारखी राहिली नसुन पूर्वी पत्रकारांचा धबधबा होता . पत्रकारिता व्यवसायिक न बनता सामाजिक बांधिलकी राहणे काळाची गरज आहे. पूर्वी बातमी छापुन आली की त्याची चौकशी लागत होती. अधिकाऱ्यांवर कारवाई होत होती . सध्या मात्र बातमीची चौकशी होत नसल्याची खंत विद्वत यांनी व्यक्त केली .
यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हा सरचिटणीस रवींद्र तांबे जिल्हा सदस्य अलीम शेख परंडा तालुका अध्यक्ष मुजीब काझी कार्यध्यक्ष प्रमोद वेदपाठक तालुका सचिव तानाजी घोडके मार्गदर्शक श्रीराम विद्वत, रतिलाल शहा, प्रा डॉ शहाजी चंदनशिवे, पत्रकार फारुक शेख, राहुल शिंदे, गोरख देशमाने, रामा गवारे, रावसाहेब काळे, साजीद शेख, राहुल बनसोडे, अर्जुन गोडगे, उत्तरेश्वर शिंदे, नाना केसकर, रावसाहेब गायकवाड, धनंजय गोपणे, समीर ओव्हाळ, दादा डाके, विजय मेहर, आदि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व पत्रकार बांधवांनी सहकार्य केले. सूत्रसंचलन तानाजी घोडके यांनी केले आभार मुजीब काझी यांनी मानले

error: Content is protected !!