रक्षा विसर्जन करून नाही तर वृक्ष रोपनातून जपणार आईच्या स्मृती .

कंडारी (प्रतिनिधी) -दि ६ आपल्या घरातील गेलेल्या व्यक्तिच्या रक्षा व अस्थि तिर्थक्षेत्री किंवा नदीत विसर्जन न करता त्या व्यक्तीने आयुष्यभर कष्ट केलेल्या शेतात टाकून त्यावर वृक्षारोपण करणे म्हणजे त्या व्यक्तीबरोबर निसर्गाप्रती देखील कृतज्ञता व्यक्त करणे होय. हा आदर्श मोरे परिवाराने जपला आहे.

परंडा तालुक्यातील कंडारी येथील साळूबाई रघुनाथ मोरे यांचे दि ४ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले होते . त्यांच्या रक्षाविसर्जन नदीमध्ये करण्याऐवजी त्यांच्या शेतात विसर्जित करून त्यावर केशर आंब्याचे रोप लावण्यात आले. मोरे परिवाराने त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ एक पर्यावरण पुरक उपक्रम राबववून एक नविन आदर्श निर्माण केला आहे.

वृक्षारोपणाच्या माध्यमातून पिढ्यान् पिढ्या आपल्या जिवलग व्यक्तीच्या स्मृती जपल्या जातात. पाणी आणि हवा जीवनाच्या अत्यावश्यक गरजा आहेत व माणूस यांची नासाडी करत आहे. हा निसर्ग विनामोबदला आपल्या सर्वांना अविरतपणे ऑक्सीजन पुरवण्याचं काम करतो आहे. या माध्यमातून हा निसर्ग संवर्धन करण्याचा हा एक प्रयत्न आहे. संपूर्ण मानव जातीने पाणी व हवा यांचे प्रदूषण रोखण्यासाठी कृतीयुक्त प्रयत्न करणे गरजेचे आहे. या एकाच कृतीने नदीचे पाणी दुषित होणार नाही व एक झाड कायम स्वरुपी मातृ पितृ स्मृती म्हणून जपले जाते.या दुहेरी भावनेने वृक्षारोपण करून आपण त्या निसर्गाप्रती व आपल्या घरातील गेलेल्या माणसाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे याप्रसंगी त्यांचे चिरंजीव पै सागर मोरे,सोमनाथ घोगरे , अमर कदम , संग्राम घोगरे यांच्या सह सर्व परिवार उपस्थित होता.

Leave a Reply

error: Content is protected !!