भूम(प्रतिनिधी) :येथील जिल्हा परिषद हायस्कूल भूमला आयडीबीआय बँक शाखा भूमकडून संगणक संच प्रिंटरसह भेट देण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक तात्या कांबळे होते तर प्रमुख अतिथी गटशिक्षणाधिकारी राहुल भट्टी साहेब होते. मनोगतामध्ये भट्टी साहेब म्हणाले की, ” नवीन वर्षाचा पहिला सण संक्रांत आहे. संक्रांत म्हणजे संक्रमण आज आपल्या शाळेत संक्रमण होत आहे. शाळेला बँकेकडून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आवश्यक असलेले संगणक साहित्य मिळत आहे. म्हणजेच शाळा प्रगतीच्या संक्रमणाकडे जात आहे. या शैक्षणिक साहित्याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या विकासासाठी नक्कीच होईल असे म्हणाले.” यावेळी बँकेचे शाखाधिकारी स्वप्निल भातलवंडे, उपशाखा अधिकारी सुनीत कुमार, कर्मचारी अमोल चौधरी व रमेश वाघमारे यांच्या हस्ते साहित्य शाळेला सुपूर्द करण्यात आले. कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय गुंजाळ यांनी केले. आभार प्रदर्शन उत्तरेश्वर पायघन यांनी केले.