परंडा(माझं गांव माझं शहर) हिंदु धर्मियामध्ये होळी सण महत्वाचा मानला जाणारा आहे.फाल्गुन शुक्ल पक्ष पोर्णिमेनिमित्त सोमवार दि.२ रोजी शहरातील भवानी शंकर मंदीर, मंगळवार पेठेसह विविध ठिकाणी सांयकाळी ७ वाजुन ११ मिनिट वाजता पारंपरिक पध्ततीनुसार विधिवत पुजा अर्चा करुन होलीका दहन करण्यात आले.
होळी हा सण पविञ मानला जातो. या पविञ आग्नित निराशा,आळस,दारिद्रयाची आहुती देवुन सर्वञ सुख शांती,निरामय आरोग्याची मंगलकामना करण्यात आली.भवानी शंकर मंदिराचे मुख्य पुजारी किशोर महाराज बैरागी यांनी होळीची विधिवत पुजाअर्चा केली.शहरात ठिकठिकाणी होलीका दहन करुन मोठा जल्लोष करण्यात आला.होळीभोवताली तरुणांनी,बालगोपाळांनी बोंब मारत मोठ्या आनंद उत्साहात होळी सण साजरा केला.घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवित होलीका दहन करण्यात आले.अनेक ठिकाणी,घरोघरी आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या होत्या.
शहरातील भवानी शंकर मंदीर परिसरातील होलीका दहनला मोठा मान असुन,अनेक वर्षांची मोठी परंपरा आहे.यावेळी कपील महाराज बैरागी,नारायण जाधव,कुमोद दिक्षीत,रमेश मिश्रा, गोरख देशमाने,प्रविण मिश्रा,संकेत शुक्ला,सुरज ठाकुर,आयुष सद्दीवाल,रक्षित सद्दीवाल,समर्थ सोलंनकर,आदर्श ठाकुर,राज वळसंगकर,शिवम भातलंवडे,यश ठाकुर,प्रवेश मिश्रा आदिसह युवक बच्चेकंपनी उपस्थित होते.जय भवानी चौकातील काशीद गल्लीत मान्यवरांच्या हस्ते होलिका पुजन करण्यात आले.यावेळी महिलांची उपस्थिती होती.बच्चेकंपनीनी होळीभोवती बोंब मारत आनंद उत्सव साजरा केला.