अखंड हरीनाम सप्ताहानिमित्त पांढरेवाडी (पश्चिम) येथे भव्य रक्तदान शिबिर ; युवकांचा उत्स्फूर्त सहभाग!

परंडा, दि. २८ (प्रतिनिधी) – तालुक्यातील पांढरेवाडी (पश्चिम) येथे सुरू असलेल्या अखंड हरीनाम सप्ताहाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी आणि भक्तीचा संगम साधत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन गावचे प्रथम नागरिक शरद अभिमान भिल्लारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकार राहूल शिंदे, शिवाजी शिंदे, गणेश शिंदे,सुभाष भिल्लारे, शरद भिल्लारे आदी मान्यवर उपस्थित होते.

या दिवशी अखंड हरीनाम सप्ताहातील कल्याचे कीर्तन गहिनीनाथ गडाचे मठाधीश ह.भ.प. विठ्ठल महाराज यांच्या सुश्राव्य कीर्तनाने संपन्न झाले.

रक्तसंकलनाचे कार्य भगवंत ब्लड बँक, बार्शी यांच्या सहकार्याने पार पडले. “रक्तदान म्हणजेच जीवनदान” या संदेशाचा प्रत्यय देत अनेक युवकांनी उत्साहाने रक्तदान केले. समाजातील रक्ताची वाढती गरज लक्षात घेता युवकांनी स्वयंप्रेरणेने पुढाकार घेतला.

या शिबिरात ५१ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून सामाजिक जाणीवेचा सुंदर आदर्श घालून दिला. विशेष म्हणजे पुरुषांसोबत महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून समाजसेवेचा सुंदर संदेश दिला.

सहभागी रक्तदाते :- सुदीप शिंदे, महादेव शिंदे, गुरुदत्त शिंदे, सागर भिल्लारे, रवींद्र भिल्लारे, कृष्णा भिल्लारे, गणेश भिल्लारे, महादेव भिल्लारे, हरिभाऊ भिल्लारे, योगीराज भिल्लारे, मनोज भिल्लारे, उमेश ढमके, विजय जगताप, संदीप पवार, लक्ष्मण बाटे, शिवाजी जगताप, राजेंद्र जगताप, खंडू बाटे, आदेश जगताप, शुभम जगताप, मोहन भोईटे, उद्धव कदम, विठ्ठल जगताप, राहूल भिल्लारे, सारिका भिल्लारे, राणी तांबे, अश्विनी भिल्लारे, सुवर्णा भिल्लारे, अशा भिल्लारे, मनीषा ढमके, वैशाली अनभुले, रुपाली अनभुले, कोमल भांडवलकर, वर्षा गाढवे, विद्या भिल्लारे आदींनी रक्तदान करून शिबिर यशस्वी केले.

भक्ती, सेवा आणि समाजकार्य यांचा सुंदर संगम साधत पांढरेवाडी (पश्चिम) गावाने अखंड हरीनाम सप्ताहाच्या माध्यमातून समाजसेवेचा आदर्श घालून दिला आहे.

error: Content is protected !!