देवगांव (रावसाहेब काळे) परंडा तालुक्यातील देवगांव (बु ) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दि:3 जानेवारी 2026 रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिनाच्या रूपाने साजरी करण्यात आली. व यावेळी शाळेमध्ये बाल आनंद मेळाव्याचे देखील खूप सुंदर असे नियोजन करुन मुलांनी शाळेमध्ये बाजार पेठ थाटली होती. सुरवातीला प्रथम क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतमीचे पूजन सर्व महिला भगिनी व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ई. आठवीच्या विद्यार्थिनींनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का हे उत्कृष्ट नृत्य सादर केले. त्याचबरोबर या कार्यक्रमानंतर शाळेमध्ये यावेळी बाल आनंद बाजार याचे आयोजन करण्यात आले होते, या बाजारात लहान -लहान वस्तू साहित्य, खाद्य पदार्थ,फळे, स्टेशनरी,असे अनेक विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते.यातून विध्यार्थी, पालक, शिक्षक, ग्रामस्थ यांनी केलेल्या खरेदीमुळे विध्यार्थ्यांना आठवडी बाजाराचा अनुभव घेता आला.या स्तुस्तय उपक्रमामुळे विध्यार्थ्यांना व्यवहारज्ञान व पैशाचे महत्व,ग्रहकांशी कसा संवाद कसा करायचा याचा प्रत्यक्ष अनुभव विध्यार्थ्यांना यातून घेता आला. यावेळी केंद्र प्रमुख तथा मुख्ध्यापक श्री. संतोष देवकर सर ,शाळेतील सर्व शिक्षक कासारे सर, भोगील सर ,कुरे सर, खोत सर, गायकवाड मॅडम विद्यार्थी तसेच गावातील सर्व पालक वर्ग, अंगणवाडी ताई, सी आर. पी ताई व गावातील ज्येष्ठ नागरिक व महिला भगिनी यावेळी आवर्जून उपस्थित होते. या बाल आनंद बाजारामध्ये शाळेतील सर्व विध्यार्थी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये विद्यार्थ्यांनी वडापाव समोसा पाणीपुरी ढोकळा पावभाजी पुरी भाजी पोहे चिवडा भेळ भाजीपाला इत्यादी पदार्थ विक्रीसाठी ठेवले होते या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी तसेच विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली,