अंतरगाव येथे मोफत ३२ स्कूल किट व शैक्षणिक साहित्य ” सेवा ” उपक्रम

भूम(माझं गांव माझं शहर) भूम तालुक्यातील अंतरगाव येथील तुकाई नगर शाळेस सेवा सहयोग फाऊंडेशन मुंबई व ब्युरो व्हेरीटास कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १३ रोजी शैक्षणिक साहित्य गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.

सोळा वर्षे सेवा सहयोग फाऊंडेशन मुंबई सामाजिक कार्य करत आहे. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. त्यांची प्रगतीसाठी कायम रहावी, त्यांनी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी ते शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मोफत वाटप करत आहेत. कित्येक विद्यार्थ्यांना त्यांचे पालक वेळेवर वही ,पेन,पेन्सिल देऊ शकत नाहीत. अशा मुलांना सेवा सहयोग फाऊंडेशन चा मदतीचा हात अनमोल ठरत आहे. शाळेतील गळती कमी होण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे . असे शिक्षकांनी सांगितले.
शाळेतील शिक्षक बालाजी गुंजाळ यांना निरोप तर शिक्षक केशव पिंगळे यांचे स्वागत शाल टीफीन डबा देऊन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी गावातील तात्यासाहेब भाऊ गोरे अध्यक्ष हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ अंतरगाव , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळकृष्ण खैरे,शिक्षणप्रेमी नागरिक सोमनाथ गोरे ,प्रतिष्ठीत नागरिक ,सरपंच बिरमल बनसोडे,उपसरपंच अनंता भाऊ खैरे,सदस्य संतोष गोरे, गणेश लोद,रामहरी गोरे तर पालक गणेश गोरे सुर्यकांत गोरे,राजाभाऊ दातखिळे, विजयकुमार मडके, दत्तात्रय गोरे, गोविंद लोद, सुखदेव थोरात,धनंजय थोरात,वसंत यादव,प्रदीप यादव, आकाश चव्हाण,आण्णा देवकर असे मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैजिनाथ नरके यांनी तर उपस्थित मान्यवरांचे आभार केशव पिंगळे यांनी मानले.

error: Content is protected !!