परंडा येथे एचडीएफसी बँकेसमोर भीषण अपघात: एका महिलेचा मृत्यू.

परंडा(प्रतिनिधी) परंडा शहरातील एचडीएफसी बँकेसमोर भीषण अपघात २० नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २:३० च्या सुमारास झाला. या अपघातामध्ये बार्शी येथील सविता शंकर मुसळे  रा.नायकोडे प्लॉट, वय 52 वर्ष या महिलेचा पाठीमागून गाडी घेऊन येत असताना अचानक चक्कर आली व उसाच्या ट्रॅक्टर खाली येऊन जागीच मृत्यू झाला . या टू व्हीलर वर असणारी सहकारी महिला बांगर यांना सरकारी दवाखाना  परंडा येथे प्राथमिक उपचारासाठी पाठवण्यात  आलेल आहे.

सदरचा प्रकार रस्ता काम अरुंद , बेसिस्त पार्किंग यामुळे घडला याची चर्चा नागरिकांमध्ये जोरदार रंगू लागले आहे. रस्त्याच्या कडेला वाहने मोठ्या प्रमाणात लावलेले असतात नागरिकांना रस्त्यावरून चारचाकी वाहन जात असताना टू व्हीलर प्रवास करताना कसरत करावी लागते. त्यामध्ये अनेक दिवसांपासून रखडलेले रस्त्याचे काम या कामाकडे ठेकेदाराची दुर्लक्ष आहे सदरील कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासन यांनी त्वरित लक्ष देऊन भविष्यात घडणाऱ्या अशा अपघातावर आळा घालण्यासाठी त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थ यांच्यावतीने जोर धरू लागले आहे

परंडा येथे घडलेल्या घटनास्थळी परंडा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक आसाराम चोरमुले व पोलीस पथक तात्काळ दाखल होऊन संबंधित घडलेल्या घटनांची माहिती घेतली जखमी महिलेला उपचारासाठी दवाखान्यामध्ये पाचारण करण्यात आले व मयत कविता मुसळे यांच्या घरी संपर्क करून कळवण्यात आले अशी प्राथमिक माहिती पोलीस स्टेशन कर्मचारी अधिकारी यांनी दिली आहे.

error: Content is protected !!