शेतकरी कन्यां पल्लवी डाकवाले /मारकड यांची सहाय्यक राज्यकर आयुक्त क्लास १ अधिकारी पदी निवड .

परंडा (माझं गांव माझं शहर )मोठं स्वप्न पाहण्याची जिद्द आणि त्यासाठी मेहनतीची तयारी असेल,तर यश नक्कीच मिळतं हे परंडा तालुक्यातील आवार पिपरी येथील आल्पभूधारक शेतकर्याची कन्यां पल्लवी डाकवाले-मारकड यांनी सिद्ध केलं आहे.
नुक्तच एमपीएससी परिक्षेचा निकाल घोषीत झाला आसून यात आवार पिपरी येथील आल्पभूधारक शेतकरी श्रीहारी डाकवाले यांची कन्यां पल्लवी डाकवाले – मारकड यांची सहाय्यक राज्यकर आयुक्त क्लास १ अधिकारी पदी निवड झाली आहे.पल्लवी डाकवाले/मारकड यांच्या घरची परिस्थिती बेताची आई वडीलांनी शेतात काबाडकष्ठ करून पल्लवी डाकवाले /मारकड यांना शिकवीले जिद्द, चिकाटी,आभ्यासात सातत्य,आई वडीलांच्या कष्ठाची जानीव,पती गणेश मारकड state tax inspector यांची मोलाची साथ मिळाल्यामुळे पल्लवी डाकवाले /मारकड यांनी यशोशीखर सर केले.
पल्लवी डाकवाले /मारकड यांचे प्राथमिक शिक्षण ग्रामिन भागातील आवार पिपरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले आहे तर माध्यमिकचे शिक्षण करमाळा तालुक्यातील निभोरे येथे झाले आसून पदवीचे शिक्षण परंडा येथील रा.गे.शिदे महाविद्यालयात झाले आहे.
पल्लवी डाकवाले /मारकड यांची २०१६ मध्ये state Tax inspector पदावर निवड,२०२१ मध्ये सरकारी कामगार अधिकारी पदावर निवड तर २०२२ मध्ये सहायक गटविकास अधिकारी पदावर निवड झाली होती.तर मुक्तच स.न.२०२४ च्या एमपीएससी चा निकाल झाहीर करण्यात आला आसून यात पल्लवी डाकवाले यांची सहाय्यक राज्यकर आयुक्त क्लास १ (assistant commissioner of state tax) अधिकारी पदी निवड झाली आहे.
ग्रामिन भागातील आल्प भूधारक शेतकरी यांच्या कन्यांची सहाय्यक राज्यकर आयुक्त क्लास १ अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!