शेतकरी केबल चोर टू व्हीलरसह जेरबंद ; रुई ग्रामस्थ व परंडा पोलिसांना यश- ग्राम सुरक्षा यंत्रणेचा तात्काळ व प्रभावी वापर

परंडा (प्रतिनिधी)परंडा पोलिस स्टेशन हद्दीतील रुई तालुका परंडा जिल्हा धाराशिव येथे पहाटे 5:50 वाजता 4-5 चोर पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून चोरीच्या उद्देशाने आलेले आहेत. गावातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या नदीपात्रातील मोटरची केबल चोरून इतर आरोपी स्कॉर्पिओ गाडीतून निघून गेले आणि एक आरोपी ती केबल जाळून त्याच्यातील तांब्याची तार वेगळी करत शेजारील शेतामध्ये बसला होता. गावातील संतोष व्यवहारे यांना एका शेतामध्ये जाळ दिसला असता त्यांनी त्या व्यक्तीला जाऊन विचारना केली असता तो गडबडला,घाबरला आणि उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला.की माझे शेत आहे नांगरायचे आहे.त्यामुळे तुराट्या जळत आहे असे तो सांगत होता. त्यांना शंका आली कारण त्यांना माहीत होते शेत कोणाचे आहे आणि त्यामुळे त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ही माहिती तात्काळ गावचे माजी उपसरपंच सुमित राजेंद्र लिंकरपाटील यांना कळवली आणि त्यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन (18002703600) नंबरवरून सर्व गावांला आणि परंडा पोलीस स्टेशनला कळवली,त्यामुळे तात्काळ रुई ग्रामस्थ व परंडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले साहेब यांच्या आदेशान्वये परंडा पोलीस स्टेशनची नाईट राउंडची गाडी घटनास्थळी दाखल झाले.

गावकरी घटनास्थळी दाखल झालेले आहेत हे लक्षात येताच,तो चोर शेजारील ऊसामध्ये पळून गेला;परंतु गावकऱ्यांनी एकत्र येत पाठलाग करून ऊसाच्या आतमध्ये जाऊन चोराला पकडले आणि त्याच्याकडील टू व्हीलरसह पोलिसांच्या स्वाधीन केले.सदर घटनास्थळी सदर बीटचे बीट अंमलदार विश्वनाथ शिंदे, भुजंगराव आडसूळ,सादू शेवाळे, पोलीस पाटील विलास पाटील, माजी उपसरपंच सुमित लिंकर पाटील, संतोष व्यवहारे यांच्यासह रुई ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!