संघटना बळकट करण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपले योगदान देण्याची गरज – प्राचार्य डॉ शंकर अंभोरे


संभाजीनगर(माझं गांव माझं शहर) डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुनीत पावलाने स्थापन झालेल्या नागसेनवन परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयामध्ये स्वाभिमानी मुप्टा प्राध्यापक संघटनेचा केंद्रीय व सर्व जिल्हा कार्यकारिणीचा महत्वपूर्ण सवांद मेळावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य प्रोफेसर डॉ शंकर अंभोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
या मेळाव्यात महाराष्ट्रातून संपूर्ण जिल्ह्याचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते . या बैठकीत प्रामुख्याने सर्व जिल्ह्यातील संघटनांच्या बैठकीचे नियोजन करणे, महाराष्ट्रातील सर्व पब्लिक युनिव्हर्सिटी मध्ये आउट सोर्सिंग कर्मचारी भरत असताना 50% आरक्षित प्रवर्गातील कर्मचारी भरती करावी ,राज्यातील अनुदानित महाविद्यालयात तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांचे वेतन नियमित करावे व वेतनात वाढ करावी , महाराष्ट्रा राज्यातील विद्यापीठामध्ये प्राध्यापक भरती करत असताना 100% टक्के बॅकलॉग भरण्यात यावा ,महाराष्ट्र राज्यातील अनुदानित महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय बिल दहा लाखापर्यंत सहसंचालकांना अधिकार देण्यात यावेत,डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर व स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड यांनी विविध अभ्यासक्रमासाठी वाढविलेले शुल्क कमी करणे व पदवीधर मतदार संघातील निवडणुकी मतदार संघातील निवडणुकीसाठी जिल्हानिहाय मतदाराची नोंदणी करणे आदी विषयावर सर्व पदाधिकारी यांनी चर्चा केली.
याप्रसंगी विविध जीह्यातील पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या विभागीय कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. विभागाचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून डॉ बलभीम वाघमारे विभागाचे सचिव म्हणून डॉ उत्तम गायकवाड , कार्याध्यक्ष म्हणून डॉ शत्रुघ्न जाधव. लातूर जिल्हा अध्यक्षपदी डॉ बालाजी आचार्य हिंगोली जिल्हाध्यक्ष म्हणून डॉ महेंद्र इंगळे जिल्हा सचिव म्हणून डॉ खंदारे परभणी जिल्हाध्यक्ष म्हणून डॉ अशोक चाटसे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष डॉ विजय बैसाणे सचिव डॉ पुरुषोत्तम रामटेके कार्य ध्यक्ष म्हणून डॉ मधुकर वाकळे उपाध्यक्ष म्हणून र्डॉ मधुकर चाटसे या पदाधिकाऱ्यांच्या सर्वानुमते नियुक्ती करण्यात आल्या.
याप्रसंगी डॉ दादासाहेब गजहंस यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले . डॉ बलभीम वाघमारे ,डॉ उत्तम गायकवाड डॉ कालिदास सूर्यवंशी , डॉ शांताराम रायपुरे ,डॉ छत्रघुन जाधव ,डॉ शहाजी चंदनशिवे डॉ शाम अन्नापुरे , डॉ महेंद्र इंगळे,डॉ किरवले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ शंकर अंभोरे व संवाद मेळाव्याचे अध्यक्ष डॉ किशोर साळवे यांनी संघटना बळकट करण्यासाठी या कठीण परिस्थितीत प्रत्येकाने अधिक योगदान देण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले.
भविष्यातील सर्व विद्यापीठातील प्राधिकरणाच्या निवडणुका सर्व शक्तीनिशी संघटना लढेल असाही निर्णय या केंद्रीय कार्यकारणीच्या बैठकीत त घेण्यात आला .महाराष्ट्रातील बहुतांश अनुदानित शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यापीठामध्ये बहुजन समाजातील कर्मचाऱ्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात संघटना ताकतीनिशी लढेल असा निश्चय करण्यात आला .याप्रसंगी सेवानिवृत्त झालेल्या प्राध्यापक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला तसेच कॅस अंतर्गत प्रमोशन झालेल्या प्राध्यापकांचा यथोचित सत्कार करण्यात आला .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अनिल पांडे यांनी केले तर आभार विजय बैसाणे यांनी मानले.

error: Content is protected !!