धुळे(प्रतिनिधी) कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे आज दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी ” अमृत वृक्ष ॲप ” द्वारा ऑनलाईन वृक्ष दिंडी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन कृती युक्त उपक्रम माहिती फोटो सह गुगल लिंक द्वारे सादर करण्यात आली. शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत १० कोटी वृक्षलागवडीचे उद्दीष्ट पूर्ण करण्याच्या हेतूने शाळेतील संस्थाचालक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थी विद्यार्थिनी, आणि वृक्ष प्रेमी पालक ग्रामस्थ बंधू भगिनींनी मिळून ब्राम्हणवेल गावात भव्य रॅली काढण्यात आली. रॅलीत सहभागी मान्यवरांनी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाबाबत सहकार्यासह ” एक पेड मॉं के नाम, धरती मॉ को प्रणाम !”, ” करा वृक्षांचे संवर्धन, देती आपणा ऑक्सिजन !” अशा नानाविध नाविन्यपूर्ण घोषणांनी परिसर दणाणून गेला. कार्यक्रमात सहभागी संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब तुकाराम बळीराम माळी, सचिव मा. आप्पासाहेब एकनाथ बळीराम महाजन, संचालक मा. बापुसाहेब हरिश्चंद्र माळी, सामाजिक कार्यकर्ते मा. पराग ब्राम्हणे, माता पालक भगिनी सौ. मनिषा शाम जव्हेरी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. अण्णासाहेब माळी बी. एन. विज्ञान शिक्षक श्री. माळी के. एन. कलाशिक्षक श्री. हिरामण सोनवणे, क्रीडा शिक्षक श्री. निकुंभ बी. एस. युवा प्रशिक्षित शिक्षक श्री. प्रमोद महाजन, लिपिक श्री. चेतन माळी, नाईक श्री. पंडित खैरनार, शिपाई श्री. सुनिल ठाकरे यांच्या हस्ते विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष, वृक्ष मित्र मा. नानासाहेब तुकाराम बळीराम माळी यांनी घरोघरी, शेतात, नदी काठी व जेथे योग्य जागा उपलब्ध होईल तेथे वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाबाबत आवाहन केले. विद्यालयाच्या भव्य परिसरात चोहिकडे आता कुठेही जागा शिल्लक राहिली नाही एवढे टवटवीत वृक्षराज आज आनंदाने हिरवाईने डोलत बहरत आहेत. यामागे नानासाहेबांची प्रेरणा आणि विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारींनी वृक्ष संवर्धनाबाबत विशेष मेहनत आहे. दिपावली व उन्हाळी सुट्टीतही विद्यालयाचे नाईक वृक्ष मित्र श्री. पंडित आधार खैरनार यांनी वृक्षसंवर्धनाबाबत विशेष काळजी घेतली म्हणून आज विद्यालयाच्या पटांगणातील वृक्ष संवर्धन ब्राम्हणवेल गावात परिसरातील नागरिकांसाठी विविध कार्यक्रमांसाठी आनंदवन ठरले आहे. विद्यालयाला भेट देणारे शिक्षण विभागाचे अधिकारी, मान्यवर प्रसन्न चित्ताने ” आदर्श वृक्ष प्रेमी शाळा !” असे गौरवोद्गाराने कौतुक करतात. यामुळे येणाऱ्या आगामी काळात गावालगतच्या डोंगराच्या पायथ्याशी अनेक वृक्ष लागवड व संवर्धन उपक्रम राबविण्याचा शाळेने संकल्प केला आहे.