४७ व्या जागतिक वारसा समितीच्या बैठकीमध्ये शिवरायांच्या १२ किल्ले जागतिक वारसास्थळ मान्यता यादीत
परंडा,दि.१२ (प्रतिनिधी) फ्रान्सची राजधानी पॕरीस येथे दिनांक ०६ जुलै २०२५ ते १६ जुलै २०२५ दरम्यान ४७ वी जागतिक वारसा समितीची बैठक सुरू आहे. जागतिक वारसा समितीची बैठक वर्षातून एकदा होते. या बैठकीस युनेस्कोच्या संचालिका श्रीमती आंद्रे अझेले यांच्यासह १५० देशांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. जागतिक वारसा समितीच्या बैठकीस आंतरराष्ट्रीय वारसा व परिषदेचे सदस्य परंडा येथिल…