Img 20250721 wa0016

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) पक्षाच्या जिल्हा प्रवक्ते पदी ॲड विशाल साखरे यांची नियुक्ती

  तुळजापूर (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धाराशिव जिल्हा प्रवक्ते या पदावर विशाल साखरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे      स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे…

अधिक बातमी वाचा...
520256234 1299677828180695 1780128221543175688 n

राज्यातील हजारो दिव्यांग बांधवांना मिळणाऱ्या मासिक अनुदानात वाढ .

धाराशिव (प्रतिनिधी ) मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने महाराष्ट्रातील दिव्यांगांच्या सामाजिक सशक्तीकरणासाठी ठोस पाऊल उचलत एक महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील निर्णय घेतला आहे. राज्यातील हजारो दिव्यांग बांधवांना मिळणाऱ्या मासिक अनुदानात आता ₹१,००० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी दिव्यांगांना दरमहा ₹१,५०० इतके अनुदान मिळत होते. आता हे वाढवून ₹२,५०० प्रतिमाह करण्यात आले आहे….

अधिक बातमी वाचा...
Img 20250720 wa00001.jpg

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के व जिल्हा उपाध्यक्ष मोहन बनसोडे यांचा परांडा येथे सत्कार.

परंडा:(१९ जुलै) ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव प्रा.किसन चव्हाण यांच्या आदेशाने वंचित बहुजन आघाडी धाराशिव जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली यामध्ये परंडा येथील वंचित बहुजन आघाडी चे धनंजय सोनटक्के यांची जिल्हा महासचिव तर मोहन बनसोडे यांची जिल्हाउपाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षा च्या वतीने शुभेच्छा देऊन सत्कार…

अधिक बातमी वाचा...
Javal ni plant tree

जवळा नि: ग्रामपंचायत कडून 6000 झाडे लावण्याचा गावकर्याचा निश्चय.

जवळ(प्रतिनिधी) परंडा तालुक्यातील जवळा गावामध्ये जिल्हा प्रशासन व उस्फुर्त लोक सहभागातून तसेच हरित धाराशिव अभियानातून जवळा येथे ऑक्सिजन पार्क म्हणून प्राथमिक आरोग्य परिसरात विविध दोनशे प्रकारच्या प्रजातींची लागवड करण्यात सुरुवात झाली आहे. यामध्ये आंबा,सिताफळ,करंजा,पेरू ,आवळा अशा दोनशे प्रकारच्या प्रजातींचय झाडाची लागवड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात करण्यात आली आहे. जवळा ग्रामपंचायत प्रशासनाकडून 6000 झाडे लावण्याचा निश्चय…

अधिक बातमी वाचा...
Img 20250718 wa0038

विधानभवना मध्ये राडा : वंचित बहुजन आघाडीची कारवाई ची मागणी.

परंडा १८ (प्रतिनिधी) लोकशाहीला काळीमा फासणारी निंदनीय घटना महाराष्ट्र राज्यातील विधानभवना मध्ये सत्ताधारी आणि विरोधी आमदारांच्या समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटने संदर्भात कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावेत यासाठी वंचित बहुजन आघाडी चे निवेदन.       महाराष्ट्र राज्यातील विधान भवनामध्ये विधानसभा,विधान परिषद सदस्यांचे राज्याच्या जनतेच्या विविध प्रश्नां संदर्भात अधिवेशन चालू असून गुरुवार दिनांक १७ जुलै२०२५  रोजी सत्ताधारी आणि विरोधी…

अधिक बातमी वाचा...
शून्यातून उभा व्यवसाय, जिद्दीने थाटला संसार – रमेश जगताप यांची प्रेरणादायी वाटचाल!

शून्यातून उभा व्यवसाय, जिद्दीने थाटला संसार – रमेश जगताप यांची प्रेरणादायी वाटचाल!

परंडा, दि. १७ : परंडा तालुक्यातील मुगाव गावातील रमेश बजिरंग जगताप यांनी शून्यातून व्यवसाय उभा करून संघर्षातून यशाचा प्रवास घडवला आहे. सुरुवातीला शहरात वडील बजिरंग जगताप ठेकेदाराकडे काम करत असत. त्यांच्या प्रेरणेने आणि परिस्थितीपायी रमेशही मूळ गाव सोडून परंडा शहरात स्थायिक झाले. काय व्यवसाय करायचा हेही ठरत नव्हते, पण शेवटी वडिलांच्या ओळखीच्या भीमसिंह ठाकूर यांच्या…

अधिक बातमी वाचा...
Suraj Slunkhe VS Pratap sarnik

धाराशिव – कळंब मतदार संघातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या सोबत सविस्तर चर्चा.

धाराशिव – कळंब विधानसभा मतदार संघातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रतापराव सरनाईक यांच्यासमवेत धाराशिवचे शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी सविस्तर चर्चा केली. निवडणुकांमध्ये सर्वाधिक स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकविण्यासाठी जोमाने कामाला लागून शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे हात बळकट करा असे आवाहन यावेळी…

अधिक बातमी वाचा...
Zp dharashiv2025

जिल्हा परिषद निवडणूक धाराशिव जिल्ह्यात ५५ गट प्रारूप प्रभाग सूचना जाहीर.

परंडा(तानाजी घोडके) धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना अधिसूचना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी जाहीर केली असून 55 गट अर्थात सदस्य संख्या असणार आहे, या रचनेवर २१ जुलैपर्यंत हरकती व सूचना सादर करता येणार आहेत त्यावर जिल्हाधिकारी सुनावणी घेऊन ११ ऑगस्टला निर्णय घेऊन अंतिम प्रभाग रचना 18 ऑगस्टपर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी सादर करतील…

अधिक बातमी वाचा...
1752512541366

धाराशिव जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय स्थापन करण्याच्या दृष्टीने  जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

धाराशिव दि १४ (प्रतिनिधी) धाराशिव जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय स्थापन करण्याच्या दृष्टीने आज जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वाची बैठक पार पडली. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व केंद्र शासनाच्या निकषानुसार शिक्षण मिळावे, हा यामागील मुख्य उद्देश आहे. या बैठकीत केंद्रीय विद्यालय स्थापनेसाठी शहरातील भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आणि राघुचीवाडी (५ किमीच्या आत) येथील दोन संभाव्य जागांचा विचार करण्यात आला….

अधिक बातमी वाचा...
Img 20250712 wa00371

विनोबा ‘पोस्ट ऑफ द मंथ’ पुरस्काराने जिल्हा परिषद धाराशिव मध्ये शिक्षकांचा गौरव

धाराशिव(जुलै २०२५) जिल्हा परिषद धाराशिव, शिक्षण विभाग आणि ओपन लिंक्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारा आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम अर्थात विनोबा(बा) ॲपच्या माध्यमातून जिल्ह्यातील शासकीय व जिल्हा परिषद शाळेत कार्यरत उपक्रमशील शिक्षकांना प्रत्येक महिन्यात प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.    जून २०२५ या महिन्यातील पुरस्कार जिल्ह्यातील १२ शिक्षकांना जिल्हास्तरावरील ‘पोस्ट ऑफ…

अधिक बातमी वाचा...
Images+2

धाराशिव जिल्हा परिषद शिक्षक बदली प्रक्रियेला सुरुवात-टप्पा १

धाराशिव(दि.१२) जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या बदली प्रक्रियेला आज, शनिवारपासून, प्रत्यक्ष सुरुवात होत आहे. या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात, ‘संवर्ग एक’ मधील शिक्षकांना ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या पसंतीच्या शाळा निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.या ऑनलाइन प्रक्रियेअंतर्गत, बदलीसाठी इच्छुक असलेल्या शिक्षकांना तब्बल ३० शाळांचा पर्याय नोंदवता येणार आहे. शाळांचे वाटप सेवाज्येष्ठतेच्या…

अधिक बातमी वाचा...
Img 20250712 wa0019

४७ व्या जागतिक वारसा समितीच्या बैठकीमध्ये शिवरायांच्या १२ किल्ले जागतिक वारसास्थळ मान्यता यादीत

      परंडा,दि.१२ (प्रतिनिधी) फ्रान्सची राजधानी पॕरीस येथे दिनांक ०६ जुलै २०२५ ते १६ जुलै २०२५ दरम्यान ४७ वी जागतिक वारसा समितीची बैठक सुरू आहे. जागतिक वारसा समितीची बैठक वर्षातून एकदा होते. या बैठकीस युनेस्कोच्या संचालिका श्रीमती आंद्रे अझेले यांच्यासह १५० देशांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. जागतिक वारसा समितीच्या बैठकीस आंतरराष्ट्रीय वारसा व परिषदेचे सदस्य परंडा येथिल…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!