राष्ट्रीय एकता दिवस ; लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती परंडा येथे साजरी.

परंडा(माझं गांव माझं शहर )राष्ट्रीय एकता दिवस व लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती दिनानिमित्त मा. रितु खोखर , पोलीस अधीक्षक धाराशिव व मा. शफकत आमना , अपर पोलीस अधीक्षक धाराशिव व मा. अनिल चोरमले , उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली व भा. आसाराम चोरमले, पोलीस निरिक्षक पो.स्टे परंडा यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस ठाणे…

अधिक बातमी वाचा...

परंडा गटशिक्षण कार्यालयात शिपाई ते क्लार्क झालेले महानवर यांची वाढली ‘अरेरावी’ ;खातेनिहाय चौकशी करा.

परंडा दि.३० (प्रतिनिधी) – परंडा येथील गटशिक्षण कार्यालय, येथे कार्यरत असलेले कनिष्ठ सहाय्यक आप्पा महानवार यांच्या सततच्या गैरवर्तना व बेफिकीर कामकाजाच्या विरोधात माहिती अधिकारी कार्यकर्ता जीवन सुरेश खंडागळे यांनी जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. जीवन खंडागळे यांनी जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आप्पा महानवार…

अधिक बातमी वाचा...
BARSHI MURUD

मुरूमजवळील तुगाव फाट्यावरील वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर छापा; दोन बांगलादेशी तरुणी ताब्यात, तिघांवर गुन्हा

मुरूम (प्रतिनिधी )मुरूम पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तुगाव फाट्याजवळील एका धाब्यावर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर धाराशिव येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने (AHTU) धडक कारवाई केली. सोमवारी (दि. २७) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत देहविक्री करणाऱ्या दोन बांगलादेशी तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे, तर अड्डा चालवणाऱ्या तीन युवकांना अटक करण्यात आली आहे….

अधिक बातमी वाचा...

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भिंती रंगल्या गोव्या-माव्याच्या पिचकार्‍याने; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

      परंडा (तानाजी घोडके) तालुक्यातील दळणवळणाच्या रस्ता , सडक ग्रामीण भागातील रस्ते निगराणी करणारे कार्यालय म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग या बांधकाम विभागातील कार्यालयामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भिंती खिडक्या ऑफिस कोपरे गोवा, मावा, पान पिचकार्याने रंगलेल्या पहावयास मिळाल्या . दर्शनी भागामध्ये खिडक्यांच्या कोपऱ्यामध्ये हे दृश्य सार्वजनिक बांधकाम विभागातील आहे.    याकडे वरिष्ठ अधिकारी यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून…

अधिक बातमी वाचा...

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; संतप्त ग्रामस्थांकडून तातडीच्या दुरुस्तीची मागणी.

परंडा (तानाजी घोडके) परंडा तालुक्यातील देऊळगाव खैरी नदीवर असलेला कोल्हापुरी बंधाऱ्याजवळील पूल सध्या जीवघेणा ठरत असून, या मार्गावरील रहदारीमुळे मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेषतः या पुलावरून शाळा असल्यामुळे लहानग्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. देऊळगाव – डोंजा या वर्दळीच्या रस्त्यावर असलेल्या या पुलावरील संरक्षित लोखंडी कठाडे ( रेलिंग) पूर्णपणे वाहून गेले…

अधिक बातमी वाचा...

सुरुवात शाम ने केली, समारोप अमोल ने केला : श्री सरस्वती विद्यालय रामेश्वर मध्ये २५ वर्षानंतर रंगला ६०जणांचा स्नेह मेळावा.

रामेश्वर(प्रतिनिधी)सन 1999-2000 सालच्या दहावी च्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा अत्यंत उत्साहात पार पडला. मार्च २००० मध्ये दहावीची परीक्षा दिल्यानंतर सर्वांनी आपापल्या दिशेने मार्गक्रमण केले. त्या प्रवासात अनेकांनी यश, संघर्ष आणि चढउतार अनुभवले; पण आज २५ वर्षांनंतर पुन्हा शाळेच्या प्रांगणात भेटल्यावर प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तो क्षण शब्दात व्यक्त करणे प्रत्येकासाठी अवघड होते. धकाधकीच्या आयुष्यात सर्वजण आपल्या कामात…

अधिक बातमी वाचा...

आधार सामाजिक संस्था व रोटरी क्लब पाषाण पुणेच्या वतीने पूरग्रस्त 600 विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप…

परंडा (प्रतिनिधी) आधार सामाजिक संस्था व रोटरी क्लब पाषाण पुणेच्या वतीने पूरग्रस्त 600 विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.गेल्या महिन्यात आलेल्या महापुराने शेतीसह सर्वच उध्वस्त झालेल्या पूरग्रस्त गावातील विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पाषाण पुणे यांच्या सहकार्याने परंडा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या आधार सामाजिक संस्थेच्या वतीने परंडा तालुक्यातील 600 पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.समाजातील…

अधिक बातमी वाचा...

महाराष्ट्र ग्रामिण बँक स्थलांतर सोहळा उत्साहात संपन्न .

अनाळा (माझं गांव माझं शहर) दि .१७ परंडा तालुक्यातील अनाळा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा शाखा स्थलांतर सोहळा मोठ्या उत्साहात दि . १६ रोजी संपन्न झाला . अनाळा येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेची एकमेव शाखा आहे . ही शाखा गेल्या अनेक वर्षापासून अनाळा येथील ग्रामपंचायत मालकीच्या जुन्या इमारतीमध्ये चालू होती . या इमारतीमध्ये अद्यावत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे…

अधिक बातमी वाचा...

भैरवनाथ शुगर सोनारी सात लाख मे. टन गाळप करणार

परंडा दि.१४(तानाजी घोडके) तालुक्यातील सोनारी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि. या साखर कारखान्याने सात लाख मे. टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत यांनी दिली. सोनारी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि. या साखर कारखण्याच्या सन २०२५-२६ च्या अठराव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रतिपादन सोहळा मंगळवार दि. १४ रोजी मोठ्या उत्सहात…

अधिक बातमी वाचा...

आंबी पोलीस ठाणे हद्दीत खळबळः अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी..

आंबी(माझं गांव माझं शहर) एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून, झालेल्या प्रकाराची कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार आंबी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. तब्बल आठ महिन्यांनंतर पीडित मुलीने धाडस दाखवून पोलिसांत तक्रार दाखल केली असून, गावातीलच एका तरुणावर लैंगिक अत्याचार, पोक्सो आणि अँट्रॉसिटी कायद्याच्या गंभीर कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.पीडित…

अधिक बातमी वाचा...

लोकसेवा माझ्यासाठी राजकारणाचा मार्ग नाही, तर जीवनाचा श्वास आहे-दिनेश मांगले

परांडा (प्रतिनिधी) दि.१४ – तालुक्यातील शेळगाव सर्कलमध्ये काल राजकारणाच्या रंगमंचावर एक असा निर्णय घडला, की ज्याने प्रत्येक कार्यकर्त्याचे, मतदाराचे आणि सामान्य जनतेचे मन भारावून गेले. जिल्हा परिषद शेळगाव सर्कलची जागा सर्वसाधारण पुरुष घोषित झाल्यानंतर सर्वांचं लक्ष एकाच नावाकडे लागलं होतं – जनतेचा विश्वासू चेहरा दिनेश रोहिदास मांगले. परंतु सर्वांना धक्का देणारा आणि त्याचवेळी अंतःकरण पिळवटून…

अधिक बातमी वाचा...

तुळजापूर लोकमंगल मल्टीस्टेट सोसायटीतील कोट्यवधींच्या चोरीचा छडा, शिपाईच निघाला मास्टरमाइंड

धाराशिव, १४ ऑक्टोबर २०२५: तुळजापूर येथील लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये दोन महिन्यांपूर्वी झालेल्या तब्बल २ कोटी १३ लाख रुपयांच्याोरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. विशेष म्हणजे, याच शाखेत कार्यरत असलेला शिपाई दत्ता नागनाथ कांबळे हाच या चोरीचा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी त्याला नागपूर येथून अटक केली असून,…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!