भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजपाचे प्रदेश निवडणूक प्रभारी व राज्याचे महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांची जाहीर सभा संपन्न

भूम (प्रतिनिधी)तालुक्यातील ईट (जिल्हा धाराशिव) येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजपाचे प्रदेश निवडणूक प्रभारी व राज्याचे महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांची जाहीर सभा संपन्न झाली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मा. मोदीजींच्या आणि मुख्यमंत्री मा. देवेंद्रजींच्या विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राच्या संकल्पपूर्तीसाठी आणि आपल्या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी व केंद्र व राज्य सरकारच्या 154 विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी भाजपाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

यावेळी मी बोलताना आपल्या भागाचा विकास व कायापालट फक्त भाजपाच करू शकते. या भागातील प्रलंबित प्रश्नांचा उल्लेख करून ते सोडविण्याची ग्वाही देऊन भाजपाच्या उमेदवारांना “कमळ” चिन्हावर मतदान करून विजयी करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. दत्ताभाऊ कुलकर्णी तसेच जिल्हा व तालुक्यातील नेते व पदाधिकारी तसेच मतदार बंधू आणि माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!