भाजपा मा.आ. सुजितसिंह ठाकूर यांची SSC/HSC परिक्षा शुल्क माफ करण्याची विनंती.

परंडा(तानाजी घोडके) धाराशिव जिल्ह्यासह मराठवाडा तसेच राज्यातील काही जिल्ह्यात गेले काही दिवस सतत ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस कोसळत असल्याने अतिवृष्टी होऊन नद्या, नाले, ओढ्यांना महापूर येवून सर्वच शेतीपिकांचे, फळबागांचे व पशुधनांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरयांचा हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीमुळे हिरावला गेला आहे. तसेच महापूराने नदी, नाले व ओढ्या काठच्या जमिनी खरडून जाऊन अतोनात नुकसान होऊन गावची गावे पाण्यात गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. शेतकरी व सामान्य जनता प्रचंड अडचणीत आले आहेत.

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी) च्या परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख ६ ॲाक्टोबर असून उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १२ वी) च्या परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर आहे.

तरी शासनाने धाराशिव जिल्ह्यासह मराठवाडा तसेच राज्यातील पूरग्रस्त भागातील फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणारया इयत्ता १० वी माध्यमिक शालांत परीक्षांचे आणि १२ वी उच्च माध्यमिक शालांत परीक्षांचे शुल्क माफ करून नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या पालकांना व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस , शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

error: Content is protected !!