परंडा दि.१४(तानाजी घोडके) तालुक्यातील सोनारी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि. या साखर कारखान्याने सात लाख मे. टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत यांनी दिली. सोनारी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि. या साखर कारखण्याच्या सन २०२५-२६ च्या अठराव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रतिपादन सोहळा मंगळवार दि. १४ रोजी मोठ्या उत्सहात संप्पन झाला. कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत व्हाईस चेअरमन केशव सावंत व कारखाण्याचे डिझेल पंप सुपरवायझर श्री व सौं दाडे दामपत्याच्या हस्ते विधिवत पुजा करून उत्साहात संपन्न झाला. यावेळी चेअरमन अनिल सावंत म्हणाले कारखान्यातील मशीनरीचे कामकाज पूर्णत्वासं आले असून ऊस तोडणी, वाहतूक यंत्रणा पूर्ण भरली आहे. लवकरच गळीत हंगाम सुरु होणार आहे. कारखान्याच्या परिसरात यंदा ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. भैरवनाथ उद्योग समूहाचे सर्वेसर्व तथा राज्याचे माजी आरोग्यमंत्री आमदार तानाजीराव सावंत यांच्या हस्ते मोळी पूजनाचा कार्यक्रम होणार आहे. ऊसाच योग्य दर तेच जाहीर करणार आहेत.
कार्यक्रमांस माजी नागराध्यक्ष जाकीरभाई सौदागर, माजी नगरसेवक बाळासाहेब गायकवाड, वैभव पवार, सतिश मेहेर, ह. भ. प रणभोर महाराज, शाम मोरे, बुरुंगे, ढगे महाराज, आदी व कारखाण्याचे जनरल मॅनेजर प्रल्हाद ठोंबरे, डिस्टीलेरी मॅनेजर अजित भोसले, चिफ केमिस्ट दादासाहेब बोरकर, चिफ इंजिनियर रविकांत सिंग, कोजन मॅनेजर उदयशंकर गडगे, चिफ अकौटंट गोविंद कुलकर्णी, शेती अधिकारी भगवान काळे, बापूसाहेब देशमुख, कार्यालय अधीक्षक सोमनाथ सूर्यवंशी, महादेव मुळीक, सुरक्षा अधिकारी जेजेराम सूर्यवंशी, पोफळे, स्टोअर कीपर लांडगे, हेडटाईम किपर सुरेश साळुंके, ईडीपी मॅनेजर सुभाष भोसले, आबा अनवणे, भैरू गरदाडे यांच्या सह ऊस उत्पादक सभासद,शेतकरी कर्मचारी उपस्थित होते