माझं गांव माझं शहर(प्रतिनिधी)परंडा तालुक्यातील सोनारी येथील ऋतुजा संतोष लोखंडे हिने बॅचलर ऑफ डेंटल सर्जरीचा (बीडीएस) पदवी प्राप्त केली. अहिल्यानगर येथील स्वर्गीय श्री यशवंतराव चव्हाण मेडिकल कॉलेजमध्ये ऋतुजा ने पाच वर्षाचा बीडीएस अभ्यासक्रम पूर्ण केला.
दिनांक १ मार्च रोजी अंतिम वर्षाचा निकाल जाहीर झाला. सोनारी येथील फळ विक्री करणारे संतोष लोखंडे यांची डॉक्टर ऋतुजा ही मुलगी आहे. ऋतुजाचे प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण परंडा येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षण लातूर येथे झाले. पळविक्रेता संतोष लोखंडे हे तालुक्यातील विविध बाजारात जाऊन फळे विकण्याचा व्यवसाय करतात.आई बापाचं स्वप्न होते की मुलींनी शिकावे डॉक्टर व्हावे हे स्वप्न पूर्ण झाले. अखेर मुलीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपल्या आई बापाचे स्वप्न पूर्ण केले. या यशाबद्दल ऋतुजाचे सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.