बालाजी भांडवलकर व निशा लांडघुले यांचा मा.आ.ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

परंडा(माझं गांव माझं शहर)लातूर येथे झालेल्या विभागीय मैदानी स्पर्धेत जय हनुमान माध्यमिक विद्यालय, वाटेफळ, ता. परंडा येथील कुमारी निशा संतोष लांडघुले हिने १९ वर्ष १०० मीटर रनिंग स्पर्धेत विभागात दुसरा क्रमांक तर जिल्ह्यात पहिली आली तसेच हिमाचल प्रदेश येथे पार पडलेल्या किक बॉक्सींग स्पर्धेत ७५ वजन गटात वाटेफळ, ता. परंडा येथे कु. बालाजी आप्पासाहेब भांडवलकर याने प्रथम क्रमांक पटकावून गोल्ड मेडल मिळवले आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र झाला आहे.
या दोघांच्या यशाबद्दल भाजपा नेते मा.आ. श्री. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी भाजपा संपर्क कार्यालय येथे सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
यावेळी धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती सौ. सखुताई पवार, नेते रमेश नाना पवार, आप्पासाहेब भांडवलकर, बळीराम भांडवलकर, सहदेव भांडवलकर, नाना भांडवलकर, रामभाऊ गिरवले, गहिनीनाथ भांडवलकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!