धाराशिव पूरस्थिती: एकही बाधित मदतीपासून वंचित राहणार नाही; जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांची ग्वाही
धाराशिव, दि. १(माझं गांव माझं शहर) : जिल्ह्यात २१ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत कोणताही बाधित शेतकरी किंवा नागरिक मदतीपासून वंचित राहणार नाही, याची संपूर्ण दक्षता घेतली जाईल. नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून पारदर्शक पद्धतीने मदतकार्य राबवले जात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या महापुरामुळे…