कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ५००० जीवनावश्यक किट वाटपाचा शुभारंभ
धाराशिव(माझं गांव माझं शहर) जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त नागरिकांसाठी कोटक बँकेने सामाजिक उत्तरदायित्वाच्या (CSR) माध्यमातून मदतीचा हात पुढे केला आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते ५००० जीवनावश्यक वस्तूंच्या किट असलेल्या वाहनास हिरवा झेंडा दाखवून या मदतकार्याचा शुभारंभ करण्यात आला. धाराशिव जिल्ह्यातील भूम आणि परंडा तालुक्यातील पूरग्रस्त भागांना या उपक्रमाचा थेट लाभ मिळणार आहे….