परंडा (प्रतिनिधी) परंडा शहरातील जयभवानी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सालाबाद प्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात श्री गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात आला दिनांक २२ जानेवारी गुरुवारी रोजी सकाळी १० वाजता भगवंत रक्तपेडी संचलन बार्शी संस्थेचे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या रक्तदान शिबीरात ५१ युवकांनी रक्तदान केले शिबीराचे उद्घाटन परंडा नगरीचे उपनगराध्यक्ष समरजितसिंह ठाकूर नगरसेवक मन्नान बासले, नगरसेवक मदनसिंह सद्धीवाल या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उद्योजक धीरजसिंह ठाकूर जयभवानी गणेश मंडळाच पद् धिकारी ॲड अनिकेत काशीद पंकज नांगरे प्रशांत नांगरे जयंत काशीद आप्णा लोकरे कुणाल जाधव अतुल काशीद आकाश काशीद सनी काशीद अदित्य नांगरे बॉबी काशीद शंतनु खर्डेकर योगेश मस्के ओमकार काशीद विनायक काटवटे मयुर जाधव सुजय जाधव सचिन (बाळु )’ आगरकर रोहन आगरकर इतर मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री गणेश जन्मोउत्सव व महाआरती करण्यात आली नंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला या वेळी परंडा शहर व परिसाराती ल शेकडो भाविक भक्त उपस्थितत होते.