परंडा पंचायत समितीच्या सभापती पदी अर्चना जाधव यांची निवड ; उपसभापती पदी गवारे


परंडा :परंडा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडीचा कार्यक्रम दि. ०६ रोजी पार पडला यावेळी सकाळी सभापती पदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली यावेळी शिवसेना शिंदे गटाकडून तालुका प्रमुख आण्णासाहेब जाधव यांच्या पत्नी अर्चना जाधव यांनी व राष्ट्रवादी काँगेसच्या मोनिका पाटील यांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल केला तर उपसभापती पदासाठी शिवसेना शिंदे गटाचे परशू गवारे व राष्ट्रवादी काँगेसच्या पंकज पाटील यांनी अर्ज दाखल केले सभापती व उपसभापती पदासाठी दोन दोन अर्ज आल्याने ही निवड प्रक्रिया मतदान घेवून घ्यावी लागली शिवसेना शिंदे गटाचे ६ सदस्य असल्याने बहुमताचा आकडा त्यांच्याकडे होता परंतु राष्ट्रवादी ने अवघे दोन सदस्य असताना देखील सभापती व उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केले परंतु बहुमत नसल्याने त्यांना तोंडघशी पडावे लागले

शिवसेना शिंदे गट या पक्षाला बहुमत असल्याने अर्चना आण्णासाहेब जाधव यांचा विजय नक्की होता त्यामुळे जाधव याच सभापती होणार असे मॅसेज देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते
दुपारी दोन वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सभापती पदी अर्चना आण्णासाहेब जाधव व उपसभापती पदी परशू गवारे यांची निवड झाल्याचे जाहीर केले

error: Content is protected !!