आठवडी व दैनंदिन बाजार ठेक्यावर देण्यास मंजुरी; परंडा नगर परिषदेच्या बैठकीत निर्णय.


परंडा(माझं गांव माझं शहर) परंडा नगरपरिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत आठवडी व दैनंदिन बाजार ठेक्यावर देण्यास मंजुरी देण्यात आली. परंडा नगरपरिषदेच्या सभागृहात झालेल्या या सभेला मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली, अधीक्षक जगदीश सोंडगे, मुनीर जिकरे यांच्यासह सत्ताधारी व विरोधी नगरसेवक उपस्थित होते. सभेत विविध विषयांवर चर्चा करून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.


२०२१-२७ या आर्थिक वर्षासाठी आठवडी बाजार व दैनंदिन बाजाराचा लिलाव करण्याबाबतचा ठराव सभेसमोर मांडण्यात आला. या ठरावावर उपनगराध्यक्ष समरजितसिंह ठाकूर, नगरसेवक रमेश परदेशी, अनिल शिंदे, परविन बासले यांनी चर्चा करताना बाजाराचा लिलाव झाल्यानंतर लिलावधारकांकडून बाजारातील दुकानदार व विक्रेत्यांकडून मंजूर दरापेक्षा जास्त पैसे आकारले जातात आणि त्यांना जागा मोजून दिली जात नाही. त्यामुळे विक्रेत्यांची पिळवणूक होत असल्याचे मत व्यक्त केले. यासाठी बाजाराचा लिलाव न करता नगर परिषद कर्मचान्यांकडूनच कर वसुली करण्यात यावी, असा प्रस्ताव त्यांनी मांडला. यावर नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर यांनी मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली यांना या विषयावर अभिप्राय देण्यास सांगितले. त्यावर मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली यांनी बाजार वसुलीसाठी नगरपरिषदेकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले.


तसेच बाह्य यंत्रणेमार्फत मनुष्यबळ नेमून वसुली करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार नसल्याने विविध विषयांनाही मंजुरी भांडार विभाग, पाणीपुरवठा विभाग, बांधकाम विभाग, लेखा विभाग तसेच इतर सर्व विभागांसाठी आवश्यक साहित्य खरेदी व सेवा पुरवण्यासाठी निविदा काढण्याचा निर्णयही एकमताने घेण्यात आला. सभेसमोरील इतर विषयांनाही मंजुरी देण्यात आली.


नगरपरिषदेच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे नगरपरिषद कर्मचान्यांकडून बाजार वसुली करणे योग्य ठरणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. या चर्चेनंतर आठवडी बाजार व दैनंदिन बाजाराची वसुली ई-लिलाव पद्धतीने प्रशासनाच्या संकेतस्थळावर करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर यांनी दिली.

error: Content is protected !!