बावची विद्यालय, परंडा येथे संविधान अमृत महोत्सवानिमित्त पथनाट्य

परंडा (माझं गांव माझं शहर) : शासनाच्या आदेशानुसार बावची विद्यालय, परंडा व वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालय परंडा येथे दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी संविधान अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जनजागृती करण्यासाठी संविधान जनजागृती पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.

पथनाट्याच्या माध्यमातून भारतीय संविधानाचे महत्त्व तसेच नागरिकांचे मूलभूत हक्क व कर्तव्ये याबाबत प्रभावी संदेश देण्यात आला. स्वातंत्र्य, समता व बंधुता या संविधानिक मूल्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आले.

या कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. नारायण खैरे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सदर उपक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीमती वैशाली सोनवणे व श्रीमती प्रियंका सोनकांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

error: Content is protected !!