परंडा, दि. १७ (तानाजी घोडके) तालुक्यातील परंडा ते वारदवाडी रस्त्याचे काम सध्या सुरू आहे, मात्र या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे दिसून येत आहे. ब्राम्हगाव ते ढगपिंपरी या अंतरातील सदर मुरूम कामात मोठ्या प्रमाणात माती आहे, त्यामुळे रस्त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चांदणी ते वारदवाडीच्या दिशेने मातीमिश्रित खडीवर डांबरकाम केले जात आहे, जे पूर्णपणे नियमबाह्य आहे. या कामाबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेऊन ते काम पुन:श्च करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
या रस्त्याच्या कामाबाबत तमाम पक्षांच्या नेते मंडळी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी आणि कामाचा दर्जा सुधारण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिक जनतेकडून होत आहे. सुजाण लोकांनीही या बाबतीत पुढाकार घेऊन कामाचा दर्जा सुधारण्यासाठी करावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.