परंडा(प्रतिनिधी)परंडा येथील जिल्हा परिषद शाळा व गरजू मुलांना शैक्षणिक साहित्याची गरज भासते आणि ती ओळखून सामाजिक युवा नेते डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्याकडून 60 विद्यार्थिनी यांना प्रत्येकी अर्धा डझन वह्या वाटप करण्यात आले. समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण घेणे सुलभ व्हावे त्यांना शिक्षण कार्यात हातभार लागावा या उद्देशाने त्यांनी जिल्हा परिषद शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना एकूण 5000 रुपये किमतीच्या वह्या वाटप करण्यात आले.यावेळी तय्यब शेख,फिरोज पठाण,प्रसाद दानाने जिल्हा परिषद कन्या प्रशालेचे मुख्याध्यापक दिनकर पवार, शिक्षक भाऊसाहेब सुर्यवंशी, आबासाहेब माळी, शुभांगी देशमुख, साबिया तांबोळी गीतांजली मंडलिक, मीनाक्षी मुंढे,रेखा उसराटे,
उपस्थित होते.भाऊसाहेब सुर्यवंशी सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.