परंडा येथे भाजपाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.

परंडा (माझं गांव माझं शहर, दि.१४) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी परंडा शहर व ग्रामीणच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी भारतीय संविधानाचे शिल्पकार, बोधीसत्व, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन भाजपा नेते मा. आ. सुजितसिंह ठाकूर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा सदस्य धनंजय दादा सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे आणि शहराध्यक्ष उमाकांत गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमास उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, नगरसेवक तथा युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते, सरचिटणीस धनाजी गायकवाड, ॲड. जहीर चौधरी, गौतम लटके, जयदेव गोफणे, विकास कुलकर्णी, सुजित परदेशी, ॲड. भालचंद्र औसरे, ॲड. तानाजी वाघमारे, शिवाजीराव पाटील, हनुमंत पाटील, केदार पाटील, नगरसेवक सत्तार पठाण, इस्माईल कुरेशी, अनिल शिंदे, मदनसिंह सद्दिवाल, अब्बास मुजावर, सोमनाथ आलबत्ते, मजहर देहलुस, अकिब पठाण, साहेबराव पाडुळे, परसराम कोळी, जोतीराम गिरवले, सारंग घोगरे, बाबासाहेब गिरी, शंकर ईतापे, दिपक गायकवाड, रणजित मिस्कीन, पांडुरंग मुसळे, रामकृष्ण घोडके, अजिम हन्नुरे, धनंजय काळे, गौरव पाटील, सिध्दीक हन्नुरे, सुरज काळे, मिलिंद शिंदे, निर्मलकुमार गांधले, किशोर वाघमारे, प्रा. विलास गायकवाड, सागर पाटील, अभिषेक चोबे, रामेश्वर चोबे, महिला मोर्चा शहराध्यक्षा जोतीताई भातलवंडे तसेच इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करत सामाजिक समतेचा संदेश दिला.

error: Content is protected !!