महावितरणचा ‘स्मार्ट’ दणका ; पूर्वसूचना न देताच वीजपुरवठा खंडित, परंडा तालुक्यात ग्राहकांमध्ये तीव्र संताप.

परंडा (तानाजी घोडके)महावितरणने राज्यात बसवलेल्या नवीन ‘स्मार्ट मीटर’चा कारभार आता ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. वीज बिल न भरल्यास कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता थेट वीजपुरवठा खंडित (Automatic Cut-off) केला जात असल्याने सर्वसामान्य ग्राहकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
काय आहे नेमका प्रकार?
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या घरांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत, तिथे बिल भरण्यास थोडाही विलंब झाला तर यंत्रणेद्वारे स्वयंचलित पद्धतीने वीज सफलाय आयोमिटिक कट होत आहे. विशेष म्हणजे, यासाठी महावितरणकडून ग्राहकांना कोणताही फोन, मेसेज किंवा लेखी सूचना दिली जात नाही. अचानक वीज गायब झाल्याने ग्राहकांना तांत्रिक बिघाड झाल्याचे वाटते, मात्र चौकशी केल्यावर बिल थकीत असल्याचे समोर येते.
बिल भरल्यावरही २० मिनिटे ताटकळत!
केवळ वीज कापण्यावरच महावितरण थांबत नाही, तर बिल भरल्यानंतरही वीजपुरवठा तातडीने सुरू होत नाही. ऑनलाईन बिल भरल्यानंतर वीज पुन्हा सुरू होण्यासाठी किमान १५ ते २० मिनिटांचा कालावधी लागत आहे. रात्री-अपरात्री किंवा कामाच्या वेळी अचानक वीज गेल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
ग्राहकांचे आरोप:
“महावितरणचा हा भोंगळ कारभार आहे. किमान २४ तास आधी कळवणे अपेक्षित आहे. डिजिटल इंडियाच्या नावाखाली ग्राहकांना वेठीस धरले जात आहे,” अशी भावना एका संतापलेल्या ग्राहकाने व्यक्त केली. स्मार्ट मीटरच्या या कार्यपद्धतीबद्दल ग्राहकांना पुरेशी माहिती किंवा प्रशिक्षण देण्यात महावितरण अपयशी ठरल्याचे चित्र दिसत आहे.
महावितरणने स्पष्टीकरण द्यावे:
अचानक वीज कट झाल्याने ‘स्मार्ट’ पद्धतीमुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि घरून काम करणाऱ्या नोकरदारांचे मोठे नुकसान होत आहे. महावितरणने ही तांत्रिक सक्ती करण्यापूर्वी ग्राहकांना विश्वासात घेणे गरजेचे होते, अशी मागणी आता जोर धरत आहे.

स्मार्ट मिटर बसविताना ग्राहकाना विश्वासात घेतले नाही महावितरणने मनमाने मिटर बसविले आहे अधिकारी / कर्मचारी मुख्यालय राहत नाही . डेपीचे फीयूज गेले तर चार त्यापेक्षा जास्त तास फीयूज बसवत नाही . तरी देखील कर्मच्यारी अधिकारी यांच्यांवर नियंत्रण कोणाचे आहे ? नाही . नेते मंडळी यांचे दुर्लक्ष साहेब माहित आहे का ? नाही हे खेळ चाललय काय-फारुख शेख

error: Content is protected !!