परंडा(प्रतिनिधी) शेतकरी वर्गात तलाठी आणि ग्रामविकास अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने तीव्र नाराजी पसरली आहे, कारण यामुळे शेतकऱ्यांची कामे, जसे की सातबारा काढणे, विविध दाखले मिळवणे आणि शासकीय योजनांचा लाभ घेणे, यात मोठा अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे त्यांना तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात आणि वेळेवर मदत मिळत नाही, परिणामी विकास खुंटतो परंडा तालुक्यातील गांव कामगार तलाठी व ग्रामपंचायती चे ग्रामविकास आधिकारी हे आपल्या नियुक्ती च्या ठिकाणी राहात नसलेल्या मुळे ग्रामस्थांना अनेक अडचणी ना समोर जावे लागत आहे.बहुतेक तलाठी व ग्रामसेवक हे आपल्या मुख्यालयी राहात नाहीत.अनेक जण बार्शी-करमाळा या मोठ्या शहरात वास्तव्यास आहेत.कधी तरी कार्यालयात येतात आणि लगेच निघून जातात. वरिष्ठांनी त्यांना दोन ठिकाणी सज्जा कारभार दिल्यामुळे ते मुख्यालयी हजर नसतात. त्यामुळे नागरिकांना शासकीस कामासाठी लागणारे डॉक्युमेंट/ प्रमाणपत्रे सहया शिके हे वेळेवर मिळत नाहीत. महसूल विभागाची ऑनलाईन साईट ही नेहमीच वेळोवेळी बंद पडत असल्याने शेतकरी वर्गास आवश्यक कागदपत्रे तलाठी याच्या कडून घेणे गरजेचे असताना ते कार्यालयात हजर नसल्याने मोठी गैरसोय निर्माण होते.
तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या दूर्लक्षा मूळे कर्मचारी अधिकारी मुख्यालय राहत नाही !
मुख्यालय उपस्थित राहील्यास नागरिकांचे कामे वेळेवर होतिल. नागरिकांना त्रास होणार नाही : फारूक शेख उपसरपंच
तालुक्यातील बहुतांशी गांव कामगार तलाठी यांनी आपले शासनाने नेमुन दिलेले सज्जे सोडून परंडा शहरात आपली कार्यालये सुरू केली आहेत नागरिकांना जी कागदपत्रे आपल्या गावातल्या गांवात मिळण्याऐवजी परंडा येथे यावे लागत आहे. तेव्हा वरिष्ठ अधिकारी यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन ग्रामसेवक व तलाठी यांना आपल्या मुख्यालयी राहाण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी सर्व सामान्य नागरिकांतुन होत आहे.