मनसेची बैठक संपन्न तयारीत रहा,ढवळे यांनी दिले आदेश.

परंडा : भुम -परंडा तालुक्यात मनसेची ताकद आहे.स्वबळावर लढण्यासाठी कार्यकर्त्यांना संधी मिळेल. त्यासाठी पक्षाने स्वबळावर लढण्याची भूमिका घ्यावी, असा आग्रह मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी यावेळी केला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे वरिष्ठ नेते दिलीप बाबू धोत्रे, यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे जिल्हाध्यक्ष आबासाहेब ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली येथील विश्रामगृह परंडा येथे बैठक पार पडली परंडा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या पाच तर पंचायत समितीच्या दहा जागा असून स्वबळावर लढल्यास मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळेल,असे मनसे कार्यकर्त्यांची अशी भावना आहे.

याच दृष्टिकोनातून या बैठकीत परंडा-भूम पंचायत समिती, जिल्हा परिषद इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मनसे जिल्हाध्यक्ष आबासाहेब ढवळे, जिल्हा सचिव नागेश मोरे, विधानसभा अध्यक्ष रमेश नाईकनवरे, विधानसभा उपाध्यक्ष गणेश अवताडे, भूम तालुका अध्यक्ष अमोल कदम, परंडा तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, परंडा शहराध्यक्ष नवनाथ कसबे, सचिव बाळासाहेब कांबळे, पांडूरंग लोखंडे, बाबासाहेब सावंत यांच्या उपस्थितीत घेतल्या, श्री आबासाहेब ढवळे स्वतः जिल्हा परिषद, डोंजा मधून निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे, समविचारी मित्र-पक्षांकडून आम्हाला युतीचा प्रस्ताव आल्यास आमच्या वतीने सकारात्मक विचार केला जाईल आम्ही त्यांच्या सोबत युती-धर्माचे पालन करणार मिळून निवडणूक लढविली जाणार,

अन्यथा आम्ही स्वतंत्र स्वबळावर संपूर्ण मजबूत ताकदीनिशी निवडणूक लढविणार असल्याचे, त्यांनी दोन्ही तालुक्यांमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सांगितले आणि तयारीत रहा असे आदेश दिले. या बैठकीमध्ये अनेक इच्छुक उमेदवारांनी आप आपला कार्य अहवाल सादर करत, निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले.

error: Content is protected !!