परंडा(प्रतिनिधी) बावची विद्यालय, परंडा येथे बालिका दिनानिमित्त क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. हे प्रतिमा पूजन मनिषा बनसोडे मॅडम , यमुना सायकर मॅडम यांच्या हस्ते पार पडले.
या प्रसंगी विद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कु.खबाले वैष्णवी, कु.सुप्रिया तिंबोळे, कु.श्रुष्टी परभणे कु. जाधव गौरी या विद्यार्थिनींनी जोरदार भाषणे केली. तसेच इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी बालिका दिवस याविषयी नाटक, गायन नृत्य सादर केले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री नारायण खैरे सर व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते. तसेच विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कु. आलिया पठाण, श्रावणी शेळवणे, अनुष्का आरेकर व आभार प्रदर्शन तन्वी शिंदे हिने केले . सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा व बालिकांच्या शिक्षणाचे महत्त्व यावर आपले विचार मांडले बालिकांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण किती आवश्यक आहे, याबाबत उपस्थितांना प्रेरणा देण्यात आली. कार्यक्रम शांततेत व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.