अनिल शिंदे मित्र परिवार व युवा प्रतिष्ठाण च्या वतीने साहिल शेख , रमेश क्षिरसागर यांचा सत्कार .

अनाळा(दि . २३) परंडा तालुक्यातील अनाळा येथे समाजसेवक अनिल शिंदे यांच्या संकल्पनेतून युवा उद्योजक विक्रम पाटोळे यांच्या वाढदिवसानिमित्त दि . २२ रोजी अनाळा येथील १०० युवकांना स्वेटर , टिशर्ट चे वाटप करण्यात आले . या कार्यक्रमात भारतीय सैन्य दलात भरती झालेला अत्यंत गरिब परिस्थिती असलेला साहिल गुलाब शेख व परंडा पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत असलेले पोलीस रमेश क्षिरसागर यांनी विविध गुन्हयातील तपास लावून केलेली उत्तम कामगिरी यामुळे त्यांचा अनिल शिंदे मित्र परिवार व युवा प्रतिष्ठाण च्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला . समाजसेवक अनिल शिंदे यांच्या माध्यमातून उदयोजक विक्रम पाटोळे यांनी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेल्या तालुक्यातील अनेक गावात हजारो किराणा किट वाटप , ब्लॅकेट , शाली वाटप केल्या आहेत . गोरगरिब गरजूंना आर्थिक मदत करत आहेत . शालेय विद्यार्थांना लाखो रुपयाचे शालेय साहित्य वाटप उदयोजक विक्रम पाटोळे यांनी केले आहे . या सामाजिक कार्यात लक्ष्मण क्षिरसागर पाटील व केशव पवार यांचे मोठे योगदान मिळत आहे . कार्यक्रमास युवा प्रतिष्ठाण चे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ मोठया संखेने उपस्थित होते .

प्रतिक्रिया -उदयोजक विक्रम पाटोळे यांनी परंडा व भूम तालुक्यातील अनेक गावात पूरग्रस्तांना मदत , शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून एक आगळा वेगळा आदर्श समाजात निर्माण केला असून त्यांच्या कार्यातून आम्हाला स्फुर्ती मिळते – अनिल शिंदे समाजसेवक .

error: Content is protected !!